सामाईक विहिरीच्या पाणी वाटपावरून तरुणाचा निर्घृण खून
मौजपूरी गावातील खळबळजनक घटना.. पाच आरोपी अटक; दोन फरार
विरेगाव/गणेश शिंदे दि.17
शेतातील सामायिक विहिरीच्या पाण्याचा वाटणीवरून चुलत भावाने 25 वर्षीय तरुणाचा निर्घृण खून केल्याची घटना रात्री 11 वाजता जालना तालूक्यातील मौजपूरी येथे घडली आहे._
योगेश बाबासाहेब डोंगरे (वय 25) असे मयताचे नाव आहे.
काल सकाळी झालेला वाद गावकऱ्यांनी मध्यस्थी करून मिटवला होता.
मात्र, रात्री उशीरा बाहेर गावी राहत असलेल्या चुलत भावाने मौजपूरी येथे येऊन तीन भावांच्या मदतीने योगेश डोंगरे यास बेदम मारहाण करून खून केला आहे.
या मारहाणीत योगेशची पत्नी शिल्पा ही गंभीर जखमी झाली आहे.
घटनेची माहिती कळताच परतुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश बुधवंत यांच्यासह सपोनि. मिथुन घुगे, उपनिरीक्षक राकेश नेटके आदींनी फौजफाट्यासह तातडीने घटनास्थळी भेट दिली.
मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला असून, त्याची उत्तरीय तपासणी सुरू आहे.
याप्रकरणी मयताचे वडील बाबासाहेब डोंगरे यांच्या फिर्यादीवरून शालीकराम उर्फ सावळाराम डोंगरे, पंडित डोंगरे, रामेश्वर डोंगरे, पवन टोम्पे, नानीबाई डोंगरे, कविता डोंगरे, आसाराम डोंगरे, या 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे._
याप्रकरणात 5 जणांना अटक करण्यात आली असून, तपास सपोनि. घुगे करीत आहेत