दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, बजाजनगर येथे श्री स्वामी पुण्यतिथी निमित्त आयोजित अखंड नाम-जप-यज्ञ सप्ताहाची उत्साहात सांगता
● मुल्यसंस्कार विभागातील गर्भसंस्कार, शिशुसंस्कार विषयावरील प्रदर्शन, प्रात्यक्षिक व मार्गदर्शन ठरले विशेष आकर्षण ● 65 सेवेकऱ्यांनी केले रक्तदान

छ.सभाजीनगर/आनिल वाढोणकर,दि.26
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठ, त्र्यंबकेश्वर येथील पिठाधिष परमपूज्य गुरूमाऊली श्री. अण्णासाहेब मोरे यांच्या आशिर्वादाने बजाजनगर येथील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात श्री स्वामी पुण्यतिथी निमित्ताने अखंड-नाम-जप-यज्ञ व श्री गुरुचरित्र सामूहिक पारायण सप्ताहाचे आयोजन करण्यात करण्यात आले होते.
दि.20 एप्रिल रोजी सप्ताहाचा आरंभ होऊन आज दिनांक 26 एप्रिल रोजी महानैव्यद्य आरतीने या सप्ताहाची सांगता झाली. या सप्ताहात एकुण 765 महिला व पुरुष सेवेकरी श्री गुरूचरीञ पारायणासाठी बसले होते. यामध्ये महिला सेवेकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे. सप्ताह काळात विविध प्रकारच्या अध्यात्मिक सेवेचे नियोजन करण्यात आले होते.
दि.20 एप्रिल रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचा महाभिषेक, मंडल स्थापना, स्थापित देवता आवाहन व अग्निस्थापना करून उत्सवाला सुरवात झाली. दैनंदिनी मध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा महाभिषेक, सामुदायिक श्री गुरूचरीञ पारायण, नित्य स्वाहाकार, औदुंबर प्रदक्षिणा, भूपाळी आरती, विषेश याग, नैवेद्य आरती, श्री स्वामी चरित्र सारामृत, श्री दुर्गा सप्तशती पाठ व श्री रूद्रावर्तने, नैवेद्य आरती, विविध विषयांवर मार्गदर्शन, श्री विष्णू सहस्त्रनाम, प्रहरे इत्यादी विषेश भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सप्ताह काळात गुरूवार, दि.24 एप्रिल रोजी महिलांसाठी विशेष गर्भसंस्कार, शिशुसंस्कार व बालसंस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शेकडो महिलांनी सदरील शिबीराचा लाभ घेतला. गर्भधारणा ते सुलभ प्रसुती काळ, शिशुसंस्कार व बालसंस्कार या विषयावर उपस्थित प्रतिनिधींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या 20% अध्यात्म आणि 80% समाजकार्य या उक्तीला प्रेरीत होऊन आज (दि.26) रक्तदान शिबीराचे अयोजन करण्यात आले होते. यामध्ये 65 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक कार्यात सहभाग घेतला. रक्तसंकलन महाराष्ट्र ब्लड बँकेच्या वतीने करण्यात आले .
आज( दि.26) रोजी श्री सत्य दत्त पुजन व बली पूर्णाहूती होऊन सकाळी 10:30 वाजता महानैवेद्य आरतीने सप्ताहाची सांगता करण्यात आली.
महाआरती नंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला.
रांजणगाव ,पंढरपूर ,वाळूज ,
बजाजनगर परिसरातील भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला .
धकाधकीच्या जीवनात अध्यात्मिक स्थैर्य व मनःशांती मिळवण्यासाठी सप्ताहकाळ ही अभूतपूर्व पर्वणी ठरली असल्या च्या भावना अनेक भाविकांनी व्यक्त केल्या .
कार्यक्रम यशस्वितेसाठी बजाज नगर केंद्रातील व्यवस्थापन व नियोजन प्रतिनीधींने प्रयत्न केले .