pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

सिद्धार्थ महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा अंतर्गत ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन

0 4 1 3 3 6
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.23

जाफराबाद येथील सिद्धार्थ महाविद्यालयात
महाराष्ट्र शासनाच्या वाचन संकल्प महाराष्ट्राचा २०२६ या उपक्रमांतर्गत तसेच मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्याच्या निमित्ताने सिद्धार्थ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, जाफराबाद येथे दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता भव्य ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश देशमुख यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. हा कार्यक्रम ग्रंथालय विभाग व मराठी भाषा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
उद्घाटनप्रसंगी प्राचार्य डॉ. रमेश देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वाचन संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित केले. “ग्रंथ हे ज्ञानाचे भांडार असून वाचनामुळे व्यक्तिमत्त्व विकास, विचारप्रवृत्तीची समृद्धी व भाषिक कौशल्य वाढीस लागते. आजच्या डिजिटल युगातही पुस्तकांशी मैत्री जपणे अत्यंत आवश्यक आहे,” असे त्यांनी नमूद केले.
या ग्रंथ प्रदर्शनात मराठी साहित्य, कादंबऱ्या, कविता संग्रह, चरित्रे, आत्मचरित्रे, स्पर्धा परीक्षेस उपयुक्त पुस्तके, संदर्भ ग्रंथ तसेच सामाजिक व वैचारिक विषयांवरील विविध ग्रंथ विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. प्रदर्शनास विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने भेट देत ग्रंथांविषयी उत्सुकता दर्शविली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रंथालय विभागाचे प्रमुख प्रा.अशोक पठाडे व ग्रंथालयातील सर्व कर्मचारी तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो.डॉ.सुनिल मेढे,उपप्राचार्य विनोद हिवराळे व मराठी भाषा विभागातील प्रो. विजय पाटील, प्रा.डाॅ. एस.पी.जगतवाड प्रा.बी.आर .गाढवे यांनी विशेष परिश्रम घेतले. या ग्रंथ प्रदर्शनास महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होऊन मराठी भाषेच्या संवर्धनास चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 3 3 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे