pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

मुल्यसंस्कार मेळावा व मातृ-पितृ पाद्य पूजन सोहळ्याच्या निमित्ताने भव्य शिक्षक मांदियाळी चे आयोजन

0 1 7 4 1 4

छ.संभाजीनगर/आनिल वाढोणकर,दि.8

दिनांक २६ व २७ नोव्हेंबर रोजी मुल्यसंस्कार मेळावा व मातृ-पितृ पाद्य पूजन सोहळा दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रमुख व श्री गुरूपीठ- त्र्यंबकेश्वर येथील पिठाधीश गुरुमाऊली परमपुज्य आण्णासाहेब मोरे यांच्या पावन सान्निध्यात होणार आहे. या निमित्ताने मुल्यसंस्कार मेळावा आयोजन समितीच्या वतीने भव्य शिक्षक मांदियाळी चे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी १०.३० वाजता दिप प्रज्वलन व सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. मुल्यसंस्कार मेळाव्याच्या निमित्ताने गर्भसंस्कार, बालकाचा सर्वांगीण विकास, पंच ज्ञानेंद्रिय विकास, स्तोत्र – मंत्र यांचे वैज्ञानिक दृष्टिकोन, पुर्वाश्रमीचे चालत आलेले सण-वार-उत्सव त्यांच्यामागील वैज्ञानिक दृष्टिकोन, मुल्यसंस्कार मेळाव्यामध्ये राबवले जाणारे विविध उपक्रम, प्रदर्शन दालन, ज्ञानदान कक्ष, विविध प्रात्यक्षिक, शेतीशास्त्र याची माहिती श्री गुरूपीठ प्रतिनिधी यांनी आपल्या प्रस्तावनेत दिली.भव्य शिक्षक मांदियाळी साठी बजाजनगर व परिसरातील सर्वच शाळेतील संस्थाचालक, मुख्याध्यापक व शिक्षकवृंद उपस्थित होते. मुल्यसंस्कार ही काळाची गरज असून शाळा आणि मुल्यसंस्कार ही एका गाडीचे दोन चाक आहेत व प्रत्येक विद्यार्थी हा बालसंस्कार वर्गात जाणारा असावा असे प्रतिपादन भोंडवे ग्रुप चे सर्वेसर्वा श्री. हनुमान भोंडवे यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले दिनांक २६ व २७ नोव्हेंबर रोजी परमपूज्य गुरूमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांच्या पावन सान्निध्यात होणाऱ्या मुल्यसंस्कार मेळावा व मातृ-पितृ पाद्य पूजन सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मुल्यसंस्कार मेळावा आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे