शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सेवेची हक्काचे दस्ताऐवज मिळवून देण्याबाबत संजय नारायणराव भातलंवडे यांचे निवेदन

जालना/प्रतिनिधी, दि.9
शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सेवेची हक्काचे दस्ताऐवज मिळवून देण्याबाबत संजय नारायणराव भातलंवडे यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक याना निवेदन दिले आहे.
विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांनी पुढे असे म्हटले आहे की,श्री संजय नारायणराव भातलंवडे विभागीय अध्यक्ष भाजपा शिक्षक आघाडी मराठवाडा यांचे निवदेन दि.28.08.2024 रोजी या कार्यालयास प्राप्त झाले. सदरील निवेदनाच्या अनुषंगाने अनेक खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित संस्था मध्ये कार्यरत असलेले
शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना खालील प्रमाणे अतिशय महत्वाचे त्यांच्या सेवेशी संबंधित असलेले दस्तऐवज संस्था व मुख्याध्यापक मार्फत जात नाही. जसे 1. प्रथम नियुक्ती आदेश प्रत (1981 नियम 4/5 अनुसुची ड) 2. नियुक्ती आदेश
जोडपत्र ब.3. प्रथम मान्यता आदेशा प्रत (परिवीक्षाधीन कालावधी शिक्षण सेवक व शिक्षकेत्तर सेवक) 4. सेवासातत्य
प्रत.5. दुय्यम सेवापुस्तक 6. वेतन प्रमाणपत्र 7. वरिष्ठ निवड श्रेणी मान्यता आदेश प्रत. 8. पदोन्नती आदेश व मान्यता प्रमाणपत्र प्रत. प्रभविष्य निर्वाह निधी परतावा ना परतावा आदेशाचे प्रत. ।। नॉमिनेशन आदेश प्रत. अश्या प्रकारे वरील सर्व आदेशाचेप्रत संस्था व मुख्याध्यापक मार्फत कर्मचाऱ्यांना देणे बंधनकारक असुणही दिले गेलेले नाही ही बाब कर्मचाऱ्यावर अन्याय करणारी असून हक्काचे दस्तऐवजा पासून त्यांना वंचित ठेवणारी आहे. तसेच या संदर्भात मा. संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी सर्व विभागांना आदेश दिले असून आपण आपल्यास्तरावर वरील दस्तऐवज शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांना मिळून देण्यासाठी कायदेशीर कार्यवाही करावी. असे संदर्भिय निवेदनात नमुद केले आहे.
सबब, खाजगी अनुदानित व अंशःत अनुदानित संस्थामध्ये कार्यरत असलेल्या शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना अतिशय महत्वाचे त्यांच्या सेवेशी संबंधित असलेले दस्ताऐवज संस्था/मुख्याध्यापकामार्फत देण्याबाबत प्रचलित शासन निर्णय/अधिसूचना/नियम/शासन परिपत्रक व नियमानुसार कार्यवाही करावी.