pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

गावठाण गावातील अंतर्गत रस्त्यांवर पेव्हर ब्लॉक,चेकर लादी बसविण्याच्या कामाचा शुभारंभ.

0 1 1 8 3 4

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.20

चिर्ले ग्रामपंचायतीचे मा सदस्य तथा शेकापचे ज्येष्ठ नेते कै.शंकर चांगु टकले, शर्मिला शंकर टकले, यांच्या व्दितीय पुण्यतिथीचे औचित्य साधून गावठाण गावातील अंतर्गत रस्त्यांवर पेव्हर ब्लॉक, चेकर लादी बसविण्याच्या कामांचा शुभारंभ शनिवारी ( दि२०) माजी सरपंच दिपक मढवी, विद्यमान सरपंच सुधाकर उर्फ काका पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.

माजी आमदार विवेक पाटील यांचे समर्थक असलेल्या कै.शंकर चांगू टकले व शर्मिला शंकर टकले या दांपत्याचे कोरोनाच्या संकटात निधन झाले होते.त्यांच्या व्दितीय पुण्यतिथीचे औचित्य साधून माजी सरपंच दिपक रामचंद्र मढवी यांनी गावठाण गावात सामाजिक जीवनाशी बांधिलकी जपत अंतर्गत रस्त्यांच्या सुशोभिकरण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी चिर्ले ग्रामपंचायतीचे सरपंच सुधाकर उर्फ काका पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर पाटील,माधव घरत, ग्रामपंचायत सदस्य आकाश टकले, विकास पाटील, हिराजी मढवी, सुनील मढवी, राजेश पाटील,रोशन सुरेश डाकी, विश्वनाथ पाटील, सुनील घरत, रंजित पाटील,प्रसाद पाटील, निखिल मढवी, धनंजय मढवी,उत्तम टकले, किशोर मढवी, जनार्दन मढवी, अंकुश पाटील, प्रल्हाद मढवी, आशिष मढवी,अक्षय मढवी,केशव घरत,संदिप घरत,मा सदस्य शरद घरत, महेश मढवी,तुळशीराम मढवी, अनुराग मढवी, नारायण ठाकूर, धनंजय मढवी, राजेंद्र विजय पाटील सह शेकापचे कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 3 4