pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

सार्वजनिक गणेश मंडळांना नोंदणीकरीता ऑनलाईन परवानगीची सुविधा उपलब्ध

0 1 7 4 1 4

जालना/प्रतिनिधी,दि. 8 

दि. 19 ते 28 सप्टेंबर 2023 या कालावधीत गणेश उत्सव साजरा करण्यात येणार आहे. जालना जिल्ह्यात जे सार्वजनिक गणेश मंडळ आहेत त्यांना नोंदणीकरीता ऑनलाईन परवानगीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तरी त्यांनी नोंदणीसाठी खालील प्रमाणे ऑनलाईन परवानगी अर्ज सादर करावेत. असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले आहे.
सार्वजनिक गणेश मंडळाच्यावतीने अध्यक्ष / अर्जदार यांनी (https://citizen.mahapolice.gov.in) या संकेत स्थळावर जाऊन नागरिकासाठी उपलब्ध असलेल्या सिटिझन पोर्टलवरील ऑनलाईन सर्व्हिसेसमध्ये वैयक्तीक माहिती भरुन (USER ID) तयार करावा. सदरचा USER ID वापरुन सार्वजनिक गणेश मंडळ यांनी गणेश उत्सव साजरा करणे बाबत अर्ज परिपुर्ण सादर करावा.

सदर ऑनलाईन अर्ज सादर करताना काही तांत्रिक अडचण आल्यास अर्जदारांनी पोलीस निरीक्षक आय. एस. पेरगुलवार जिल्हा विशेष शाखा जालना मो.क्रं. 9767139050 व CCTNS प्रभारी मपोउपनि विद्या झिरपे मो.क्रं.8788725553 यांचेशी संपर्क साधुन मार्गदर्शन घ्यावे. अर्ज यशस्वीरित्या सादर झाले बाबत अर्जदारास SMS/EMAIL द्वारे कळविण्यात येईल. असे श्री. पेरगुलवार यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे