pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जालना येथील मे. पावन स्टिल टेक प्रायव्हेट लिमीटेड प्रस्तावित प्रकल्प पर्यावरणविषयक जाहीर सुनावणीत आक्षेप नोंदविण्याचे आवाहन

0 1 7 4 0 8

जालना/प्रतिनिधी,दि. 4

मे. पावन स्टिल टेक प्रायव्हेट लिमीटेड प्लॉट नं.डी-57,फेज-1,एमआयडीसी जालना आणि गट नं.66 गाव दरेगाव ता.जि.जालना या प्रस्तावित फेरो अलॉयज युनिट आणि प्रकल्पामध्ये 66,000 टन/वर्ष तयार करण्यासाठी फेरो अलॅाय, एसएएफ 2×18एमव्हीए आणि 2×60 मेट्रीक टन क्षमतेची प्रेरणा भट्टीस्थापित करुन 2000 टन प्रति/दिन बिलेटस, 1500 टन प्रति/दिन टीएमटी बार/राऊंड बार/वायर रॉडची रोलिंग मील आणि 500 टन प्रति/दिन स्ट्रिप एमएस शिटस/एमएसपाईप्स/एमएस फ्लॅट/एमएस अँगल्स/एमएस स्क्वेअर बार/एमएस चॅनल/एमएस बीम्स/एसएस प्लेटस प्रकल्पामध्ये एमएस बिलेटस 750 टीपीडी ते 2000 टीपीडी आणि टीएमटी बार 833.33 टीपीडी ते 2000 टीपीडीचे उत्पादन करण्याबाबत पर्यावरण विषयक जाहिर लोकसुनावणी दि.12 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता  आयोजित केली आहे. तरी या प्रकल्पाबाबत सुचना किंवा आक्षेप असल्यास सुनावणीच्या तारखेपूर्वी उपप्रादेशिक कार्यालय, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, प्लॉट नं. पी-3/1 व पी-3/2 अतिरिक्त एमआयडीसी फेज-2 जालना येथे सादर करावेत, असे आवाहन महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी सो.म.कुरमूडे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
मे. पावन स्टिल्स टेक प्रायव्हेट लिमीटेड प्लॉट नं.डी-57,फेज-1,एमआयडीसी जालना आणि गट नं.66 गाव दरेगाव ता.जि.जालना या प्रस्तावित प्रकल्पामध्ये उत्पादन करणेबाबत पर्यावरणविषयक जाहीर लोकसुनावणी दि. 12 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11  वाजता मे. पावन स्टिल्स टेक प्रायव्हेट लिमीटेड प्लॉट नं.डी-57,फेज-1,एमआयडीसी जालना आणि गट नं.66 गाव दरेगाव ता.जि.जालना या ठिकाणी ठेवण्यात आली आहे.
प्रकल्पाच्या  परिसरामधील रहिवासी, पर्यावरणविषयी काम करणाऱ्या संस्था, या प्रकल्पामुळे अन्य प्रकारे प्रभावित होणारे रहिवासी यांना या प्रकल्पासंबंधी विचार, टिका, टिप्पणी तोंडी किंवा लेखी स्वरुपात जाहीर सुनावणी दरम्यानसुध्दा नोंदविता येतील. या प्रकल्पाविषयी व पर्यावरण मुल्यांकन अहवालाच्या सारांशाची माहिती असलेले दस्तावेज जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा उद्योग केंद्र, महानगरपालिका, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कार्यालय, तहसिल कार्यालय, तसेच जालना तालुक्यातील दरेगाव ग्रामपंचायत कार्यालयात, औरंगाबाद येथील महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ प्रादेशिक कार्यालय, मुंबई येथील सायन  पूर्व महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या मुख्यालयात, मुंबई मंत्रालयातील पर्यावरण विभागात तसचे नागपूर येथील सिव्हील लाईन नवीन सचिवालय इमारतीतील पर्यावरण वने व हवामान बदल मंत्रालयाच्या प्रादेशिक कार्यालयात संबंधित असणाऱ्या व्यक्ती कागदपत्रे कार्यालयीन वेळेत अभ्यासू शकतील. असे महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी सो.म.कुरमूडे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे