भंडारा उधळणाऱ्या समाज बांधवास मारहाण प्रकरणी धनगर समाजाचा जाहीर निषेध
धनगर आरक्षणासाठी फुंकले रणसिंग

अनिल भालेकर/अंबड,दि.9
राज्यातील धनगर जमातीच्या अनुसूचित जमाती आरक्षणाची सरकारने तातडीने अमलबजावणी करावी तसेच सोलापूर येथे धनगर आरक्षणाच्या अमलबजावणी बाबत निवेदन देण्यासाठी गेलेल्या शेखर बंगाळे यांना झालेल्या मारहाणीचा तीव्र निषेध करण्यात येवून मंत्री राधाकृष्ण विखे यांनी या प्रकरणात धनगर जमातीची माफी मागावी याकरिता दि.13 सप्टेंबर 2023 रोजी सकल धनगर जमातीच्या वतीने अंबड येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर रास्तारोको आंदोलन आयोजित केले आहे.
तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि
तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत येताच धनगर आरक्षणाची अमलबजावणी करु असे लेखी आश्वासन दिले होते मात्र सत्ता येवून आठ वर्षे झाले तरीही सरकार अमलबजावणीस विलंब करीत आहे.
राज्यात मेंढपाळावर अन्याय अत्याचाराच्या घटना वाढत असुन चराई बंदी असल्याने शेळी मेंढी आदी पशुधनाच्या चराईचे संकट निर्माण झालेले आहे. धनगर जमातीला बहाल केलेल्या योजनांची अमलबजावणी होत नाही तसेच सरकार केवळ धनगर जमातीच्या सत्ताधारी पुढा-यांच्या मर्जीने वागत आहे,टीस समितीचा अहवाल जाहीर करण्यात यावा, आरक्षण अमलबजावणी न झाल्याने धनगरांना सामाजिक न्याय मिळालेला नाही या निषेधार्थ आम्ही शांततेच्या मार्गाने व भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार सरकारच्या दारात न्याय मागण्यासाठी येत आहोत.
अंबड शहर व तालुक्यातील धनगर समाज बांधवांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.
———————————————————-
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांना निवेदन द्यायला गेलेल्या धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांना अंगावर पिवळा भंडारा टाकला म्हणून अमानुष मारहाण केली गेली….जर विखेना भंडारा चालत नसेल तर त्यांच्या तोंडाला काळे फासू…. राधाकृष्ण विखेंच्या तोंडाला काळे फासणाऱ्यांना युवा मल्हार सेनेच्या वतीने 51 हजार रुपये बक्षीस देण्यात येईल…
सुरेश भावले
प्रदेशाध्यक्ष,युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य