ब्रेकिंग
पालकमंत्री अतुल सावे 25 जून रोजी जालना दौऱ्यावर

0
3
0
5
5
9
जालना/प्रतिनिधी,दि.24
राज्याचे गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण समिती विभागाचे मंत्री तथा जालना जिल्हयाचे पालकमंत्री अतुल सावे हे मंगळवार, दि. 25 जून 2024 रोजी जालना जिल्हयाच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सकाळी 8.30 वा. छत्रपती संभाजीनगर येथून शासकीय वाहनाने जालनाकडे श्री. सावे प्रयाण करतील. सकाळी 9.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे त्यांचे आगमन होणार आहेत. सकाळी 10.00 वा. त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे. त्यानंतर सोयीनुसार ते छत्रपती संभाजीनगरकडे वाहनाने प्रयाण करतील.
0
3
0
5
5
9