शासकीय कार्यालयांना वेतनासाठी जिल्हा सांख्यिकी प्रमाणपत्र कोषागार कार्यालयात सादर करण्याचे आवाहन
जालना/प्रतिनिधी,दि. 26
नियोजन विभागाच्या परिपत्रकानुसार कर्मचारी सर्वंकष माहितीकोष 2024 तयार करण्याचे काम जिल्हा सांख्यिकी कार्यालयामार्फत सुरु करण्यात आले असून जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय कार्यालयातील आहरण व संवितरण अधिकारी यांनी त्यांच्या कार्यालयाची व त्यांच्या अस्थापनेवरील नियमित, नियमितेतर, रोजंदारीवरील, अंशकालीन, मानसेवी व तदर्थ तत्त्वावर असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची दि. 1 जुलै 2024 या संदर्भ दिनांकाची माहिती ऑनलाईन आज्ञावलीमध्ये नोंदविणे बंधनकारक राहील.
अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या https://mahasdb.maharashtra.gov.in/CGE
या लिंकवर जावुन अधिकारी व कर्मचारी यांची माहिती अद्यायावत करावयाची आहे. ही माहिती ऑलनाईन नोंदवून जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे प्रमाणपत्र -1 जोडल्याशिवाय माहे नोव्हेंबर 2024 देय माहे डिसेंबर 2024 ची वेतनदेयके कोषागार कार्यालयाकडून स्वीकारण्यात येणार नाहीत याची सर्व राज्य शासकीय आहरण व संवितरण अधिकारी यांनी नोंद घ्यावी. तसेच ज्या शासकीय कार्यालयांची वेतनदेयके कोषागारात सादर होत नाहीत, अशा सर्व कार्यालयांनी देखील त्यांच्या कर्मचाऱ्यांची व रिक्त पदांची माहिती ऑनलाईन आज्ञावलीद्वारे नोंदणी करुन जिल्हा सांख्यिकी अधिकारी यांच्याकडे सादर करण्याचे आवाहन उपसंचालक जिल्हा सांख्यिकी कार्यालय सु.बा. कुलकर्णी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.