pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

खोट्या बिलांद्वारे रू. ६४.०६ कोटीच्या  बोगस इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा करणाऱ्या कंपनीच्या सूत्रधारास  महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवाकर विभागाकडून अटक

0 3 2 1 7 2

मुंबई, दि.10

शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाकडून वस्तू व सेवाकर चुकवेगिरी संदर्भात सुरु असलेल्या धडक मोहिमेअंतर्गत मे. एसपीजी मल्टी ट्रेड प्रा.लि. या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी  प्रिन्स गोयलवय ५३ वर्षे यांस दि. ०२ डिसेंबर २०२४ रोजी अटक करण्यात आली असल्याची माहिती राज्यकर उपआयुक्त यांनी  दिली आहे.

मे. एसपीजी मल्टी ट्रेड प्रा.लि. या कंपनीवर वस्तू व सेवा कर विभागाकडून अन्वेषण कार्यवाही सुरू करण्यात आली होती. या संदर्भातील तपासात कंपनी प्रत्यक्षात कोणत्याही वस्तू व सेवांचा पुरवठा न करता खोटी बिले आणि बोगस वाहतूक पावत्या जारी करत असल्याचे आढळून आले. त्याद्वारे कंपनीने रूपये ६४.०६ कोटीच्या इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा करून शासनाची फसवणूक केली आहे.

मे. एसपीजी मल्टी ट्रेड प्रा.लि. या कंपनीच्या सर्व कामकाजास व व्यवहारास जबाबदार असल्यामुळे  प्रिन्स गोयल यांचा या फसवणूकीत प्रत्यक्ष सहभाग असल्याचे आढळून आहे. ही संपूर्ण कार्यवाही  षण्मुगाराजन एस. (भा.प्र.से.)राज्यकर सहआयुक्तअन्वेषण-क  तसेच नयना गोंदावलेराज्यकर उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली,  विलास नाईक आणि  अजित विशेसहायक राज्यकर आयुक्त यांच्याकडून संयुक्तपणे राबविण्यात आली. या कार्यवाहीत राज्यकर निरीक्षकांचे उल्लेखनीय योगदान आहे.

सन २०२४-२५ मध्ये केलेल्या या ९ व्या अटकेद्वारे महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाने कर चुकवेगिरी करणाऱ्यांना कठोर इशारा देण्यात आला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 7 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे