ब्रेकिंग
12 जानेवारीला पेंशन अदालत
0
3
0
5
5
9
जालना/प्रतिनिधी,दि.28
छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयातील आस्थापना उपायुक्त यांनी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या तक्रारी निकाली काढण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यानूसार पेंशन अदालत दि.12 जानेवारी 2024 रोजी सकाळी 12.30 वाजता जालना जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य यांच्या दालनात आयोजित करण्यात आली आहे. तरी पेंशन अदालतीसाठी सेवानिवृत्तांनी, कुटुंबनिवृत्ती वेतन धारकांनी प्रकरणाच्या माहितीसह उपस्थित रहावे, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
0
3
0
5
5
9