डिप्टी सिईओ रेखा काळम कदम यांची मनाठा येथे शाळा अंगणवाडीस परीक्षा केंद्रासह अंगणवाडीस अचानक भेटी

हदगाव/प्रभाकर डुरके,दि.28
दहावी बारावी च्या बोर्डाकडुन होणा-या परीक्षा सुरक्षित व्हाव्या यासाठी जिल्हाधिकारी डॉ.अभीजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागातील अधिकारी कर्मचारीवर्ग प्रशासन पुर्ण सज्ज असून बारावीच्या परीक्षा सुरु आहेत.
आदर्श विद्यालय मनाठा येथील परीक्षा केंद्रावर मंगळवार सत्तावीस फेब्रुवारी रोजी महिला व बालविकास विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम कदम यांनी भेट देऊन आवश्यक त्या सुचना केली.याच भेटीत त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला गावातील अंगणवाडी केंद्राना अचानक भेट दिली. भेटीत त्यांनी आवश्यक सुचना केली.यावेळी त्यांच्या हस्ते लाभार्थ्याना शासनाकडून मिळणारे बेबी किट देण्यात आले.
यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी उमेश मुदखेडे, जिल्हा कक्ष प्रमुख भास्कर , अंगणवाडी पर्यवेक्षिका एस.व्ही.ढवळे,मनाठा सरपंच प्रतीनिधी विशाल शिंदे, उपसरपंच बोईनवाड, ग्रामपंचायत सदस्य सुनील चौरे ,आदर्श विद्यालयाचे प्राचार्य बि.डी.नाईक शिक्षक शिक्षीका अंगणवाडी सेविका मदतनीस गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.