pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

भारतीय जनता पार्टी उलवे आयोजित नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर उत्साहात संपन्न

0 3 2 7 2 6

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.12

गोर गरीब रुग्णांना मोफत व चांगले सुविधा मिळाव्यात, रुग्णांना त्यांच्या घरा जवळच या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, आरोग्य विषयक जनजागृती व्हावी या दृष्टी कोणातून श्री साई देवस्थान साई नगर वहाळचे संस्थापक / अध्यक्ष रवीशेठ पाटील यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता पार्टी उलवेच्या माध्यमातून व आर झूनझूनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल यांच्या सहकार्याने श्री साई मंदिर वहाळ पनवेल येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन लोकनेते रामशेठ ठाकूर (माजी खासदार )यांच्या हस्ते झाले. सदर शिबिराच्या उदघाटन प्रसंगी उपस्थित असलेले आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर, भाजप रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, उद्योगपती तथा भाजपचे जेष्ठ नेते जे एम म्हात्रे, महिला नेत्या सीमा घरत, सुप्रिया म्हात्रे यांच्या हस्ते दिप प्रज्वलन झाले. या प्रसंगी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत, भाजपचे युवा नेते प्रितम म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. दिप प्रज्वला नंतर उपस्थित सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. या प्रसंगी उपस्थित असलेले काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी साईबाबांचे दर गुरुवारी दर्शन घेत असतो. दर्शन घेण्यासाठी आलो असता कार्यक्रम दिसलें. उपस्थित मान्यवर दिसलें. आनंद झाला. रवीशेठ पाटील यांनी चांगल्या कार्यक्रमाचे आयोजन केले असून रवीशेठ पाटील हे एकनिष्ठ व प्रामाणिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी कमी वेळात चांगली कामगिरी केली आहे. असे सांगत महेंद्रशेठ घरत यांनी कार्यक्रमाचे व नियोजनाचे कौतुक केले.लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अनेक वर्षानंतरच श्री साई मंदिर वहाळ येथे आल्याचे सांगत गव्हाण कोपर उलवे परिसरातील समस्यावर त्यांनी कशा प्रकारे उपाययोजना केली हे उपस्थितांना सांगितले. कधीही कोणतेही समस्या असल्यास मला कळवा मी ती नक्की सोडवेन. कोणतेही समस्या असल्यास ते समस्या सोडविण्यासाठी सर्वात पुढे मी उभा असेन गव्हाण कोपर उलवे परिसरातील समस्या सोडविण्यासाठी सर्वांनी राजकारण, जात पात मतभेद बाजूला ठेवून एकत्र या असे आवाहन या प्रसंगी रामशेठ ठाकूर यांनी केले.या प्रसंगी उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, विविध सामाजिक संस्था संघटनेचे पदाधिकारी सदस्य, उपस्थित मान्यवरांचे श्री साई मंदिर वहाळचे संस्थापक अध्यक्ष रवीशेठ पाटील यांनी आभार मानले. या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला जनतेचा, नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. चांगल्या उपक्रमाचे आयोजन नियोजन केल्याने नागरिकांनी आयोजकांचे आभार मानले आहेत.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोतीराम मढवी गुरुजी यांनी केले तर आभार प्रदर्शन रवीशेठ पाटील यांनी केले. उपस्थित नागरिकांनी आरती, भजन, महाप्रसाद आदी उपक्रमांचा मोठया प्रमाणात लाभ घेतला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 7 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे