pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

स्वातंत्र्यानंतर तब्बल 69 गावांना मिळणार 24 तास वीज

गंगापूर खुलताबाद तालुक्यात 85 कोटी रुपयांची कामे सुरू. तर 240 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी व उर्वरित 214 कोटी रुपयांच्या कामांचा प्रस्ताव शासनस्तरावर दाखल. - आमदार प्रशांत बंब यांची माहिती

0 1 7 4 1 4

छ. संभाजीनगर,आनिल वाढोणकर,दि.23

जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून झालेले नद्या नाल्यांचे खोलीकरण, आत्ताच मंजूर झालेली गंगापूर उपसा जलसिंचन योजना अशा विविध योजनांमुळे विहिरींना, नद्यांना व तळ्याना मुबलक पाणी साठा वाढला व त्यातून शेतीसाठी शेतकऱ्यांची तथा औद्योगिक आणि इतर ग्राहकांची वीज मागणी वाढली. भविष्यात विजेचा वाढता खप व मागणी लक्षात घेता मतदार संघात राज्य शासन व केंद्र शासन यांच्याकडे सतत पाठपुरावा करून मतदार संघात महावितरणाचे मोठे जाळे विणत असल्याचे आमदार प्रशांत बंब यांनी सांगून मागील 48 वर्षात जितके काम झाले नाही तितके काम मागील काही वर्षात मंजूर करून गावा गावात तब्बल 250 कोटीच्या कामांना मजुरी मिळवली आणि त्यातून प्रत्यक्ष 85 कोटी रुपयांची गावठाण फिडरची कामे सुरू असून आणखी 214 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनस्तरावर मंजुरीसाठी दाखल केला आहे येत्या मार्च महिन्यात त्यास मंजुरी मिळेल. अशी माहिती बंब यांनी दिली.

लासुर स्टेशन येथे गंगापूर खुलताबाद तालुक्यातील मंजूर करून आणलेल्या महावितरणाच्या कामासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शेषराव जाधव गंगापूर तालुक्याचे तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना बंब म्हणाले की, गंगापूर खुलताबाद तालुक्यासाठी सध्या 85 कोटी रुपयांची महावितरणाची कामे सुरू असून त्यात 11 केव्हीच्या 25 वाहिनीद्वारे 69 गावांना 24 तास गावठाण वीज पुरवठा केला जाणार आहे. त्यात गावांतर्गत112 किमी पर्यंत ए.बी. केबल टाकणे, सिंगल फेज रोहित्र काढून त्या ठिकाणी नवीन 100 केव्हीचे रोहित्र बसविणे, होल्टेज वाढवण्यासाठी कॅपॅसिटर बँक टाकणे, 33 केव्ही च्या 30 किमी पर्यंत तारा बदलणे, 11 केव्ही च्या 75 कमी पर्यंत तारा बदलणे, एल टी लाईन च्या 99 किमी पर्यंत तारा बदलणे, इत्यादी कामे सुरू आहे.
त्याचबरोबर उर्वरित 160 कोटी रुपयांच्या कामांमध्ये गंगापूर तालुक्यातील मुरमी येथे 220 केव्हीचे नवीन महापरेषाण उपकेंद्र मंजूर केले आहे. त्यामुळे गंगापूर तालुक्याला 132 केव्ही चे गंगापूर व मुरमी येथे दोन उपकेंद्र मंजूर होऊन यातून 15 उपकेंद्रांना विद्युत पुरवठा केला जाणार आहे.
तसेच बोरुडी, भिवधानोरा, मालुंजा, काटेपिंपळगाव, मांजरी आरापूर व दहेगाव मुरमी या ठिकाणी नवीन 33 केव्ही चे उपकेंद्र मंजूर केले. यामुळे शेतकरी औद्योगिक व घरगुती ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
पुढील पंधरा वर्षा पायाभूत गोष्टींचा विचार करता गंगापूर खुलताबाद मतदार संघातील 114 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनस्तरावर मंजुरीसाठी दाखल केलेला असून त्या कामांना देखील मंजुरी मिळून काम प्रत्यक्षात सुरू होईल असा आशावादही त्यांनी बोलून दाखवला.

——————————————————————

शेतकऱ्यांसाठी रात्री ऐवजी दिवसा बारा तास सौर उर्जेवर
लाईट मिळावी त्यासाठी उपकेंद्रांतर्गत सौर प्रकल्पासाठी मिळावी त्यासाठी जागेची चाचपणी सुरू असून लवकरच तोही प्रकल्प मार्गी लावण्यात येईल.
मागील 48 वर्षात महावितरणाच्या निर्मितीपासून ते आत्तापर्यंत जी कामे अगोदरच्या लोकप्रतिनिधींनी करायला हवी होती ती मागील 14 वर्षात आपण मंजूर करून आणली आहे. खुलताबाद तालुक्यात 132 केव्हीचे फक्त एकच उपकेंद्र होते. त्यानंतर कसाबखेडा। निरगुडी येथे 33 केव्हीचे उपकेंद्र मंजूर केले आहे. त्याच बरोबद बाजार सावंगी येथे नवीन 132 केव्हीचे उपकेंद्र शासन स्तरावर मंजुरीसाठी दाखल केले आहे. .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे