शिष्य पवित्र नाते अधोरेखित करणारे.. निरागस! अद्भुत! अलौकिक! प्रेरणादायी स्नेहांकित अमूल्य भेट..!

अंबड/प्रतिनिधी, दि.3
शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थी हेच दैवत म्हणून विद्यार्थ्यांना सर्व गुण संपन्न बनवण्याचा प्रामाणिक प्रयत्न असतो. विद्यार्थ्यांशी मैत्रीपूर्ण, आपुलकीचे जिव्हाळ्याचे नाते प्रस्थापित करून गुरु शिष्य नाते दृढ करण्यात यशस्वी ठरतो. आणि यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात आवडते शिक्षक म्हणून स्थान निर्माण करू शकतो. आणि विद्यार्थ्यांच्या सानिध्यात स्वर्ग सुखाचा अनुभव सदैव घेत असतो.
आमच्या शाळेतील इयत्ता चौथीतील अत्यंत गुणवंत विद्यार्थी ओमकार गणेश घुगरे..! कमी वयातच चित्रकलेमध्ये अत्यंत प्राविण्य असणारा हा अत्यंत सामंजस विद्यार्थी. कसलेही प्रकारचे प्रशिक्षण नसताना विविध चित्राचे रेखाटन सुबकपणे करण्याचा त्याचा हातखंड नक्कीच कौतुकास्पद आहे.
विविध महापुरुषांचे रेखाटन चित्र, निसर्ग चित्र, प्राणी चित्र, व्यक्तिचित्र तो फोटो पाहून अप्रतिम रित्या रेखाटतो असतो.
“सर मला तुमची चित्र काढायचे आहे, अशी त्यांनी इच्छा व्यक्त करतात मी त्याला माझा एक फोटो पाठवला.. आणि एका दिवसाच्या अंतराने त्याने अत्यंत सुबक आणि लक्षवेधी माझे रेखाटन चित्र मला आवर्जून दाखवले..!
आणि खरंतर माझे रेखाटन चित्र मी पाहण्याबरोबरच वर्गातील इतर विद्यार्थ्यांनी व सहकारी शिक्षिकांनी पाहताच सर्वांनी ओमकारच्या कलेचे तोंड भरून कौतुक केले..! अतिशय मनमोहक..अप्रतिमरित्या माझे रेखाटन तयार करणे हा आयुष्यातील मौल्यवान, आनंददायी प्रशस्तीपत्रक ठरते.
हि फक्त कागदावर साकारलेल्या साधी कलाकृती नसून बालचित्रकार ओमकार यांचे माझ्याविषयी असणारा जिव्हाळा, आपुलकी, आदरभाव, अलौकिक ओढ, स्नेह.. त्यांच्यातील निरागस, प्रेमळ भावनेचे हे प्रतिबिंब आहे.
त्याने अत्यंत उत्सुकतेने, अत्यंत निरागस आदरयुक्त भावनेने, आपुलकीने साकार केलेले रेखाटने माझ्या अंतरिक मनाच्या गाभार्यात मोरपिसांच्या कोमल स्पर्श प्रमाणे अलगद जपून ठेवत आहे.
मी आयुष्यात काय कमावले असेल तर हेच विद्यार्थ्यांचे अलौकिक, निरागस, निरागस पवित्र जिव्हाळा.. ज्याची सर कशाला ही येऊ शकत नाही. क्षितिजा सारख्या असीमांत आणि सागरासारखा अथांग असणाऱ्या आमच्या गुरु शिष्य नात्याचा हा अमूल्य ठेवा मला विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रदान होणे हे माझे भाग्य ठरते. देवरूपी विद्यार्थ्यांच्या गंगाजल निर्मळ मनाने आणि त्यांच्या पवित्र हाताने माझी कलाकृती आदरपूर्वक साकारकरणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा बहुमान ठरतो..!!
बालचित्रकार ओंमकार याची चित्रकलेतील आवड आणि त्यातील कलाकार हा सुप्त गुण भविष्यात नक्कीच कला क्षेत्रात इतिहास निर्माण करत रसिका श्रोत्यांच्या मनात अधिराज्य गाजवेल यातील मात्र शंका नाही. आणि शिक्षक म्हणून त्याच्या कलेला योग्य ते प्रोत्साहन देत व्यासपीठ उपलब्ध करून देणे माझे आद्य कर्तव्य बनते..!
बालचित्रकार ओमकार यांचे शतशः आभार व कला क्षेत्रातील यशस्वी उज्वल भविष्यासाठी शुभ आशीर्वाद..!
‼️ शब्दांकन/स्वानुभव‼️
मल्हारश्री: अनिल भालेकर
आदर्श इंग्लिश स्कूल जामखेड