
0
3
7
7
5
1
जालना/प्रतिनीधी,दि.11
काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असलेले विद्यमान आमदार कैलास गोरंटयाल यांना जालना विधानसभा मतदार संघातून पुन्हा उमेदवारी देण्यात यावी अशी आग्रही मागणी करत काँग्रेस पक्षाचे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सोमवार दि.१२ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथे पक्षश्रेष्ठींची भेट घेण्याचा निर्धार केला आहे.
राज्यात आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यासह प्रदेशाध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री तथा गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री आ. अमित देशमुख आदी मान्यवर मागील दोन दिवसांपासून मराठवाडा विभागाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात उपरोक्त मान्यवर मराठवाडा विभागातील विधानसभा निहाय उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करत त्यांची मते जाणून घेत आहेत. उद्या दि. १२ ऑगस्ट सोमवार रोजी छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांची मतं जाणून घेतली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर जालना शहर व विधानसभा मतदार संघातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची पूर्व तयारी बैठक आज रविवारी दुपारी आ. कैलास गोरंटयाल यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या प्रितीसुधा नगर मधील निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जालना शहर व विधानसभा मतदार संघातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जालना विधानसभा मतदार संघातून विद्यमान आमदार कैलास गोरंटयाल यांनाच उमेदवारी देण्यात यावी अशी आग्रही मागणी केली. उद्या सोमवारी छत्रपती संभाजीनगर येथे काँग्रेस पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन त्यांच्याकडे आ. गोरंटयाल यांच्या उमेदवारीसाठी मागणी करण्याचा निर्धार आज रविवारी आयोजित बैठकीत उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला आहे. यावेळी युवा नेते अक्षय गोरंटयाल, महीला काँग्रेसच्या अध्यक्षा नंदाताई पवार, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राम सावंत, माजी न.प. सभापती महावीर ढक्का, रमेश गौरक्षक, विनोद यादव, विनोद रत्नपारखे, जगदीश भरतीया, शहर काँग्रेसचे अध्यक्ष वैभव उगले, दिलीप मोरे,गोपाल मोरे, कृष्णा पडोळ, जीवन सले, शेख शकील, नजीब लोहार, गजानन खरात, हरिभाऊ राठोड, अरुण मगरे, विष्णू वाघमारे, संजय भगत, बद्रीनाथ कायंदे, राधाकिसन दाभाडे, अंजेभाऊ चव्हाण, दत्ता पाटील घुले, आरेफ खान, सय्यद अझहर, बाबूराव खरात, विष्णू वाघमारे, करीम लीडर, अशोक भगत, अशोक उबाळे, फारुख तुंडीवाले, संगीता पांजगे, राज स्वामी, कपिल भुरेवाल, शेख रफीक, संतोष माधवले, हमीद मौलाना, शेख इब्राहिम, करीम बिल्डर, गणेश चांदोडे, आनंद वाघमारे, गजानन खरात, गणेश तिडके, नारायणराव शिंदे, बाळासाहेब शिरसाठ, किशोर कावळे, राम शेजुळ यांच्यासह जालना शहर व ग्रामीण भागातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—————————— ————————————
काँग्रेस पक्ष संघटन आणि विकास कामांवर आ.गोरंटयाल यांनी दिला भर
—————————— ———-
महाराष्ट्रासह देशात काँग्रेस पक्ष अत्यंत अडचणीत असतांनाही आ.कैलास गोरंटयाल यांनी या संकट काळात काँग्रेस पक्षावरील आपली निष्ठा जरा देखील ढळू दिली नाही. जालना शहरासह जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी देत पक्ष बळकट करण्यावर भर दिला आणि पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न केले. याशिवाय आमदार म्हणून जालना विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतांना गोरंटयाल यांनी मागील पाच वर्षात विकास कामांना प्राधान्य देत मतदार संघाला विकासाच्या वाटेवर नेण्याचा प्रयत्न केला. मतदार संघातील रस्ते, आरोग्य, पाणी, शिक्षण, वीज यासह अन्य मूलभूत सुविधा उपलब्ध करून देतांनाच जालना शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाकांक्षी ठरलेली जायकवाडी – जालना ही पाणी पुरवठा योजना आणि राज्य सरकारशी सातत्याने संघर्षाची भूमिका घेवून अलीकडच्या काळात मंजूर करून घेतलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्प आ. कैलास गोरंटयाल यांच्या पाठपुराव्याचे मोठे फलित असून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी या बाबी त्यांच्यासाठी मोठी जमेची बाजु ठरणार आहे. यासर्व बाबी लक्षात घेऊन काँग्रेस पक्षश्रेष्ठी आ. गोरंटयाल यांनाच पुन्हा एकदा संधी देतील अशी रास्त अपेक्षा पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य जनतेतून व्यक्त केली जात आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
0
3
7
7
5
1