कनिष्ठ महाविद्यालयीन समाजशास्त्र परिषदेकडून सेवानिवृत्त प्राध्यापकांचा गौरव

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.23
कनिष्ठ महाविद्यालयीन समाजशास्त्र परिषद, छत्रपती संभाजीनगर विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2025–26 निमित्त फेब्रुवारी 2027 पूर्वी सेवानिवृत्त होणाऱ्या समाजशास्त्र विषयातील प्राध्यापकांचा जाहीर सत्कार सोहळा आयोजित करण्यात येणार आहे.
समाजशास्त्र विषयाच्या अध्यापनातून दीर्घकाळ विद्यार्थ्यांच्या बौद्धिक आणि सामाजिक घडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या प्राध्यापकांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. तसेच बोर्डामध्ये एक्झामिनर व मॉडरेटर म्हणूनही महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. या सर्व शैक्षणिक आणि प्रशासकीय कार्याची दखल घेऊन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळात मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा पार पडणार आहे.
सत्कारामध्ये मानपत्र, शॉल, पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन संबंधित प्राध्यापकांचा सन्मान करण्यात येणार आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या समर्पित सेवेला कृतज्ञ अभिवादन करण्याचा परिषदेकडून हा प्रयत्न असल्याचे कळविण्यात आले आहे.
फेब्रुवारी, 2027 पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या समाजशास्त्र विषयातील सर्व प्राध्यापकांनी आपली नावे व आवश्यक माहिती परिषदेच्या पदाधिकाऱ्यांकडे लवकरात लवकर नोंदवावी, असे आवाहन राज्याध्यक्ष – डॉ. प्रकाश खेत्री, सचिव – डॉ. हेमंत सोनकांबळे, उपाध्यक्ष – डॉ. श्रीकांत पारखी कोषाध्यक्ष – डॉ.व्यंकटेश खरात, कार्याध्यक्ष- डॉ. सुनील शिंदे तसेच छत्रपती संभाजीनगर विभागीय अध्यक्ष प्रा.राजेंद्र सूर्यवंशी -9822266155, उपाध्यक्ष – प्रा. सीमा औटे-9822911196, सचिव प्रा. ज्ञानेश्वर घुले – 9850802022, कार्याध्यक्ष डॉ. रामनाथ पवार – 9422243905, प्रा. सहदेव गावंडे ,डॉ. विजयकुमार रोडे, डॉ.विद्या भिल्लारे, प्रा. नारायण राऊत, प्रा भारत जाधव, प्रा.तुळशीराम शेवाळे, प्रा.किशोर गुनावत, प्रा.अनिल डाके, प्रा. सुनील भोज, प्रा. नवनाथ कांबळे, प्रा. सतीश जाधव, प्रा.राजेंद्र राऊत, प्रा. गोपीचंद घायतिडक,प्रा. सविता पोकळे, प्रा. शरद खिल्लारे, प्रा.संतोष राठोड, प्रा. निवृत्ती लहाने, प्रा. प्रवीण लहाने, प्रा. गोविंद लहाने आदींकडून करण्यात आले आहे.
समाजशास्त्र विषयाच्या क्षेत्रातील कार्याचा गौरव करण्याची ही महत्त्वपूर्ण संधी असून संबंधितांनी या उपक्रमास प्रतिसाद द्यावा, असेही परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


