मराठवाड्यातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करावे- मराठवाडा शिक्षक संघाचे निवेदन.
जाफराबाद/विशाल देशमुख,दि.29
मराठवाड्यात यावर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने अतिवृष्टीने अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी वर्गाचे न भूतो न भविष्यती असे नुकसान झाले आहे त्यामुळे मराठवाड्यातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करावे अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव व सरचिटणीस राजकुमार कदम यांनी राज्याचे मुख्यमंत्री व शालेय शिक्षणमंत्री यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, मराठवाड्यात यावर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने अतिवृष्टीने अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी वर्गाचे न भूतो न भविष्यती असे नुकसान झाले आहे. शालांत माध्यमिक व उच्च प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी- मार्च 2026 साठी आवेदनपत्र भरणे सुरू आहे. आस्मानी संकटात सर्वस्व गमावलेल्या शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांची परीक्षा फीस भरण्याची ऐपत शेतकऱ्यांमधे राहिलेली नाही. मराठवाड्यातील शेतकरी वर्गाला आता मदतीची गरज आहे. अशा कालखंडात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मराठवाड्यातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करून अतिवृष्टीग्रस्त मराठवाड्यास मदतीचा हात द्यावा अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव, सरचिटणीस राजकुमार कदम, उपाध्यक्ष ज्ञानोबा वरवट्टे,कोषाध्यक्ष ए. बी.औताडे, केंद्रीय कार्यकारणी सदस्य प्रेमदास राठोड, आरेफ कुरेशी,जिल्हाध्यक्ष रमेश आंधळे, जिल्हा सचिव संजय येळवंते, मार्गदर्शक प्रा डॉ मारुती तेगमपुरे,प्रा डॉ पुरुषोत्तम जुने, सेवानिवृत्त शिक्षक गौतम बनसोडे,प्रा दत्ता देशमुख, सेवानिवृत्त मुख्याध्यापक अनंता जायभाये, शिवाजी केदार, कोषाध्यक्ष नारायण मुंडे,कार्याध्यक्ष फरकुंद अली सय्यद,उपाध्यक्ष भीमाशंकर शिंदे, जगन वाघमोडे, जिल्हा सहसचिव गणेश चव्हाण, प्रद्युम्न काकड, दीपक शेरे, महिला प्रतिनिधी ज्योती पांगारकर,युवा शहराध्यक्ष सोहम बोदवडे, अंबड तालुका अध्यक्ष रमेश गाढे,तालुका सचिव गणेश मेहेत्रे, जाफराबाद तालुका अध्यक्ष सुधाकर डोईफोडे,तालुका सचिव बी टी लंके, बाबासाहेब बिडवे, विजयकुमार खरात, घनसावंगी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर पवार, सचिव राधेश्याम चौधरी, शिवहरी कायंदे, प्रसिद्धी प्रमुख हकीम पटेल,भगवान धनगे यांनी राज्याचे मुख्यमंत्री व शालेय शिक्षण मंत्री यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
