pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

तीर्थक्षेत्र अरण यास शासनाचा तीर्थक्षेत्र ‘अ ‘दर्जा मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांना सावता महासंघ महाराष्ट्र राज्य संघटना दहा हजार सह्यांचे निवेदन देणार – संतोष अण्णा डोंगरखोस संस्थापक अध्यक्ष सावता महासंघ यांचे प्रतिपादन

0 1 7 4 0 8

सिंधीकाळेगाव/प्रतिनिधी,दि.12

सावता महासंघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या तृतीय वर्धापन दिन 6 सप्टेंबर 2023 रोजी आहे सावता महासंघ सामाजिक संघटना विविध सामाजिक उपक्रम नेहमीच राबवत असते.संघटनेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे तथा माळी समाजाचं श्रद्धास्थान असलेले श्री संत शिरोमणी सावता महाराज यांचे समाधी स्थळ तीर्थक्षेत्र आरण यास शासनाचा *तीर्थक्षेत्र* ”अ” दर्जा मिळवण्यासाठी दहा हजार सह्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्याचा उपक्रम वर्धापन दिनानिमित्त आयोजिला आहे.तरी वारकरी संप्रदायातील समस्त सावता महाराजांच्या भक्तमंडळींना व माळी समाजातील सर्व समाज बांधवांना व भगिनींना विनंती करण्यात येते की आपण सावता महासंघ महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेने सह्यांची जी मोहीम दिनांक 15 ऑगस्ट 2023 पासून राबवनार आहे या मोहिमेमध्ये एक सही करून समाजासाठी व वारकरी संप्रदायसाठी योगदान द्यावे अशी विनंती.जेणेकरून श्री संत सावता महाराज यांचे वारकरी संप्रदायातील कार्य समाजाला कायम उदबोधित करेल तथा तीर्थक्षेत्र आरणचा विकास होऊन येणाऱ्या कित्येक पिढ्यांसाठी ते प्रेरणादायी राहील.तेव्हा आपण सर्वांनी जास्तीत जास्त सह्या करून सावता महासंघ सामाजिक संघटना पदाधिकारी व समस्त सदस्य बांधवांना उपकृत करावे ही विनंती.

4/5 - (2 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे