ब्रेकिंग
काजळा या गावात घरोघरी गौराईचे उत्साहात स्वागत !

0
3
1
0
6
1
काजळा/प्रतिनिधी,दि.21
आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये श्रावण महिन्यात करण्याची अनेक व्रते आहेत. स्त्रियांनी करण्याच्या व्रतांपैकी अत्यंत महत्वाचे असे एक व्रत म्हणजे मंगळागौरीचे व्रत.गणपती बसल्यानंतर दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमी आणि यानंतर होते ते गौरी आवाहन. गौरी पूजन हे देखील भाद्रपद महिन्यातील महत्वाचे व्रत आहे. ज्येष्ठा गौरीचे प्रत्येकाकडे आपआपल्या परंपरेप्रमाणे पूजन होते.
आज दि.21 रोज गुरुवार या दिवशी बदनापूर तालुक्यातील काजळा या गावात 3 वाजे अगोदर जेष्ठ मंगळागौरीचे आगमन झाले. महिलांनी विधिवृत पूजा अर्चना करून मंगळागौरीचे स्वागत केले आहे. बदनापूर तालुक्यातील काजळा या गावी ठिकठिकाणी मंगळागौरीचे आगमन व स्वागताच्या कार्यक्रमात महिला अगदी रंगून गेल्या आहेत.
0
3
1
0
6
1