pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

नवतरुण मित्र मंडळ पाणजे तर्फे महाशिवरात्री उत्सव आणि श्री सत्यनारायणाची महापूजा उत्साहात संपन्न.

४१ वर्षे संस्थेचे अखंडीत सेवा

0 4 0 9 1 8
[sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.16

नवतरुण मित्र मंडळ पाणजे ही सामाजिक संस्था विविध सामाजिक ,शैक्षणिक ,सांस्कृतिक धार्मिक उपक्रमात, करण्यात नेहमी अग्रेसर राहिलेली आहे.सामाजिक बांधिलकी जपत या संघटनेने आजपर्यंत अनेक उपक्रम, कार्यक्रम राबविले आहेत.दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्रीचे औचित्य साधून नवतरुण मित्र मंडळ पाणजे तर्फे विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे महाशिवरात्री उत्सव अखंडीतपणे व मोठ्या उत्साहाने साजरी करण्याचे संस्थेचे / संघटनेचे हे यंदाचे ४१ वे वर्षे आहे.१९८६ पासून सतत अखंडीतपणे नवतरुण मित्र मंडळ पाणजे तर्फे महाशिवरात्री उत्सव साजरी केली जाते.सकाळी ६ ते ९ या वेळेत ताडाचा बंगला येथे मंगल स्नान अभिषेक, पूजन त्यानंतर श्री साईनाथ भजन मंडळ पाणजे यांचे भजन, श्री अक्कादेवी मंदिरामध्ये श्री सत्यनारायाची महापूजा,तीर्थप्रसाद मान्यवरांचे स्वागत व सत्कार समारंभ, प्रेक्षकांच्या मनोरंजनार्थ नवतरुण मित्र मंडळ पाणजे यांच्या वतीने श्री रत्नेश्वरी कला मंच जसखार उरण यांच्या तर्फे प्रस्तुत स्वर नृत्यात रंगला महाराष्ट्र आर्केस्ट्रा कार्यक्रम असे विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावर्षीचा विशेष कार्यक्रम म्हणजे उरण- पनवेल तालुक्यातील कराडी समाजातील कार्यरत असलेल्या समाजासाठी देशासाठी रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून देशसेवा करणाऱ्या पोलीस बांधवांचा यथोचित सन्मान करण्यात आला.उरण पनवेल तालुक्यातील कराडी समाज पदाधिकारी यांनी व पोलीस बांधवांनी सदर उपक्रमाचे कौतुक केले.

सदर कार्यक्रमासाठी माजी आमदार मनोहरशेठ भोईर,रायगड जिल्हा परिषद नवनिर्वाचित सदस्य डॉक्टर मनीष पाटील, प्रेरणा पाटील, पंचायत समिती सदस्य दीपक भोईर, तसेच कराडी समाज सचिव विलास पाटील, सरपंच लखपती पाटील, सुनील पाटील अविनाश पाटील, अभय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.सदर सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवतरुण मित्र मंडळ अध्यक्ष दर्शन पाटील, चंद्रकांत पाटील मिलिंद पाटील दीपेश पाटील महेंद्र पाटील, जुगल पाटील, कामेश पाटील, विक्रम पाटील , मंजीत पाटील , मयूर पाटील, नंदलाल पाटील, सुशांत पाटील,सर्व पदाधिकारी सदस्य आणि मंडळाचे सदस्य,हितचिंतक यांनी विशेष मेहनत घेतली.मंडळाचे मनोगत हेमंत पाटील,विश्वनाथ पाटील यांनी व्यक्त केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 9 1 8
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे