pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

आदर्श विद्यालयात योगा दिन साजरा!

0 3 8 6 5 3

बदनापूर/प्रतिनिधी, दि.21

बदनापूर तालुक्यातील सायगाव (डों.) येथील आदर्श विद्यालयात एक पृथ्वी, एक आरोग्य या थिम खाली ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. कारण शासन परिपत्रकान्वे शाळा, महाविद्यालय, विविध कार्यालये व सेवाभावी संस्थांनी मिळून योग दिन साजरा करून लोकांना, महिलांना व विद्यार्थ्यांना योगाच्या फायद्याची माहिती करून द्यावी. योगामुळे शरीर बळकट होते, मन शांत राहते, जबाबदारीची भावना व दैनंदिन जीवनात जागरूकता निर्माण होते यासाठी दररोज किमान एक तास तरी आपल्या आरोग्यासाठी द्यावेत व योगा करावा यासाठी योग दिवस साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विविध योग केले व माहिती करून घेतली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 6 5 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे