विजय विकास सामाजिक संस्थेतर्फे कु. जितेश रामकृष्ण भोईर याला २५००० रुपयाची वैदयकीय मदत.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.7
मु. कुंडेगाव नवघर,पो:- जेएनपीटी,तालुका उरण, जिल्हा रायगड येथील रामकृष्ण केसरीनाथ भोईर यांचा मुलगा कु.जितेश रामकृष्ण भोईर (वय १६ ) ऍपलआरस्टाईक अनेमिया नावाचा रोग झाला असून त्याच्या डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी बँन मॅरो ट्रान्सप्लान्ट ऑपरेशनची गरज असल्याचे सांगितले त्यासाठी काही चाचण्या (तपासण्या) सुध्दा करण्यास सांगितले आहे. सदर उपचारासाठी ४०,२२,८०० रुपये (चाळीस लाख बावीस हजार आठ्शे रुपये) खर्च लागणार आहेत. कु.जितेश भोईर याच्यावर तातडीने उपचार करणे गरजेचे आहे त्या अनुषंगाने जितेशचे वडील रामकृष्ण भोईर यांनी समाजातील दानशूर व्यक्ती, विविध सामाजिक संस्था, संघटना यांना सामाजिक बांधिलकी जपत आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या व गोरगरिबांच्या मदतीला नेहमी धावून जाणाऱ्या विजय विकास सामाजिक संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत कु.जितेश भोईर याचे वडील रामकृष्ण भोईर यांना जितेशच्या उपचारासाठी पंचवीस हजार रुपये सुपूर्द कले आहेत.विजय विकास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विजय भोईर, उपाध्यक्ष विकास भोईर यांच्या हस्ते ही पंचवीस हजाराची मदत करण्यात आली.विजय विकास सामाजिक संस्थेतर्फे खेळाडूंना नेहमी मदत केली जाते. तसेच गरजूना देखील मदत केली जाते.कु. जितेश भोईर याला मदत करून विजय विकास सामाजिक संस्थेने आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे.कु. जितेश भोईर याच्या ऑपेरेशन साठी समाजातील सर्व दानशूर व्यक्ती, विविध सामाजिक संस्था संघटनांनी पुढे येऊन सामाजिक बांधिलकी जपत सढळ हाताने मदत करावे असे आवाहन विजय विकास सामाजिक संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, उपाध्यक्ष तथा उद्योजक विकास भोईर यांनी केले आहे.
———————————————————–
दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था, संघटना यांनी आपली आर्थिक मदत हॉस्पिटलच्या खालील बँक अकॉउंट वर पाठवावे.
बँकेचे नाव: RBL बँक
खाते क्रमांक: २२२३३३००४३३६५७६९
खाते नाव: जीतेश भोईर
IFSC कोड: RATNOVAAPIS
(N नंतरचा अंक शून्य आहे)
फोन पे द्वारे मदत करायचे असल्यास नंबर
रामकृष्ण भोईर – फोन पे नंबर- 9769030593