मतदार यादीतील मतदारांची नावे विशेष मोहीम लावून तात्काळ समाविष्ट करा नसता आंदोलनाचा इशारा – सौ संध्या संजय देठे

जालना/प्रतिनिधी, दि.15
जालना लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये सिंगल जीन, मधुबन कॉलनी, लक्ष्मीनारायणपुरा, नरिमन नगर, इन्कम टॅक्स कॉलनी, गांधी चमन व जालना शहरातील विविध परिसरात प्रशासनाच्या वतीने कुठलीही नोटीस व समज न देता बऱ्याच जणांचे एका ठिकाणी नाव असून सुद्धा मतदार यादीतील नावे वगळण्यात आले ,
त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये नवतरुण मतदार वृद्ध महिला भगिनी यांना मतदानापासून वंचित राहावे लागले ,ऐनवेळेला नावे गायब झाली असे समजतात सर्व मतदार बंधू भगिनींना नाहक मनस्ताप सहन करावा लागला ,
भारत देशाच्या लोकशाहीमध्ये ऐन मतदानाच्या वेळी मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावा लागले
सदरील गंभीर प्रकारा संदर्भात नगरसेविका सौ संध्या संजय देठे यांनी जालन्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्री कृष्णजी पांचाळ यांची भेट घेऊन झालेल्या प्रकाराबद्दल निवेदन देऊन तात्काळ निवडणूक विभागाच्या वतीने विशेष मोहीम लावून एकाच ठिकाणी असणाऱ्या मतदारांची नावे पुन्हा 15 ऑगस्ट पर्यंत समाविष्ट करण्यात यावी अशी मागणी केली
नसता 15 ऑगस्ट 2024 रोजी झेंडावंदनाच्या दिवशी उपोषण आंदोलनाचा इशारा दिला आहे
____________
डॉक्टर श्री श्रीकृष्ण पांचाळ यांनी चार जून 2024 नंतर स्वतंत्र विशेष वगळणी झालेल्या मतदारांची पुरावेंनिशी मोहीम राबवून वगळलेली नावे सर्व समाविष्ट करण्यात येतील असे भेटीदरम्यान सांगितले