अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पीक स्पर्धा रब्बी हंगाम-2024 जिल्ह्यातील 232 शेतकऱ्यांनी घेतला पीक स्पर्धेत सहभाग
शेतकऱ्यांना तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर पुरस्कार दिले जाणार
जालना/प्रतिनिधी,दि.10
राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होवून राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यामध्ये 232 शेतकऱ्यांनी या पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेतला असून या मधून आता स्पर्धा विजेत्या शेतकऱ्यांना तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर पुरस्कार दिले जाणार आहेत. अशी माहिती कृषी विभागाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
वंचित, दुर्लक्षित तसेच पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादन तंत्रज्ञानात वाढ होण्याची आवश्यकता विचारात घेऊन तसेच जास्तीत जास्त शेतकरी पीक स्पर्धामध्ये सहभागी होतील या दृष्टीकोनातून खरीप व रब्बी हंगाम 2024 पासून पीक स्पर्धा तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर राबविण्यात येणार आहे. त्यानुसार कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम सन- 2024 मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी गहू, ज्वारी, हरभरा, करडई व जवस या पिकांसाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जिल्ह्यातील 232 शेतकऱ्यांनी या पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेतला असून यामधून आता स्पर्धा विजेत्या शेतकऱ्यांना तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर पुरस्कार दिले जाणार आहेत. रब्बी हंगाम सन 2024-25 पीक स्पर्धेमध्ये जिल्ह्यात एकुण 232 शेतकऱ्यांनी पीक स्पर्धेमध्ये भाग घेऊन सहभाग नोंदविला आहे. तालुकानिहाय सहभागी स्पर्धक संख्या पुढीलप्रमाणे जालना-20, बदनापूर-30, भोकरदन-39, जाफ्राबाद-30, परतूर-20, मंठा-29, अंबड-29, घनसावंगी-35 अशी एकुण 232 आहे. असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.