जालना : सोमवार २१ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजता शिवसेना दलित आघाडीच्या
वतीने भुमिहिन बेघर, जिल्हा स्तरावर सौरऊर्जेचा प्रकल्प दलित आदिवासी कास्त पट्टे न्याय प्रविष्ट असताना बळजबरी ताब्यात घेत असल्याचे
प्रशासनाच्या विरोधात तसेच जेनपुर (कोठारा) येथील जालना वरिष्ठ न्यायालयात न्यायप्रविष्ट असताना भोकरदन पोलिस ठाण्यामार्फत ताबा करुन
भुमिहिनांचा घरे पाडून निर्वासित केले आहे. त्या विरोधात शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख अॅड. भास्करराव मगरे यांच्या मार्गदर्शनाखाली अति विराट जनआक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.
दलित आदिवासी भूमिहीन बेघर निराधार यांच्या न्याय हक्कासाठी व तसेच जिल्हा स्तरावर सौऊर्जेचा प्रकल्प दलित आदिवासी कास्त पट्टे न्याय प्रविष्ट असताना बळजबरी ताब्यात घेत असल्याचे प्रशासनाचे विरोधात तसेच जेनपुर (कोठारा) येथील जालना वरिष्ठ न्यायालयात न्यायप्रविष्ट असताना भोकरदन पोलिस ठाण्यामार्फत ताबा करून स्थानिक दलित आदिवासी भूमिहीन
कास्तकरांचे कोंबड्या, बकर्या, घरे पाडून निर्वासित केले आहे. त्या विरोधात शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख अॅड.भास्करराव मगरे यांच्या
मार्गदर्शनाखाली विराट जनआक्रोश मोर्चा जालना जिल्हाधिरी कार्यालयावर २१ एप्रिल सोमवारी ११.३० वाजता अंबड चौफुलीपासून सुरुवात होणार असून ते
जिल्हाधिकारी कार्याल्यावर धडकणार आहे. या अति विराट मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजक आणासाहेब बाळराज, जय खरात, प्रल्हाद साळवे,
संदिप काकडे, बाबासाहेब बोबडे, विलास खरात यांनी केले आहे.