pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

मैथिली पाटील कुटुंबीयांचे महेंद्रशेठ घरत यांनी केले सांत्वन

0 3 2 7 4 9

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.13

अहमदाबादमधील विमान अपघातात पनवेल तालुक्यातील न्हावा गावातील मैथिली मोरेश्वर पाटीलचा हिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

त्यामुळे न्हावा गावातील हवाई सुंदरी मैथिली मोरेश्वर पाटील हिच्या दु:खद निधनाने न्हावा गावावर शोककळा पसरली आहे.
आज काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी मैथिलीच्या कुटुंबीयांची न्हावा येथे जाऊन भेट घेतली. न्हावा गावावर पसरलेली शोककळा पाहून महेंद्रशेठ घरत यांनाही तीव्र दुःख झाले. सांत्वन करताना ते म्हणाले, “गुरुवारी विमान अपघाताची घडलेली घटना अतिशय वेदनादायक आहे. न्हावा गावची कन्या या दुर्दैवी अपघात निधन झाल्याचे समजताच गावात स्मशानशांतता पसरलीय. मीसुद्धा ही घटना समजताच अस्वस्थ आणि दुःखी आहे. काॅंग्रेसचा एक पूर्वनियोजित कार्यक्रम ठरला होता, पण तो या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच रद्द केला आहे. जगभर मी प्रवास करतो, पण अशी घटना कधी घडली नाही. केंद्र सरकारने यांची गंभीर दखल घ्यावी. मैथिलीच्या कुटुंबीयांच्या मागे मी कायम आहे.”
यावेळी न्हावा गावचे माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र म्हात्रे उपस्थित होते. त्यांच्या चुलत भाचीची ती मुलगी आहे. यावेळी न्हावा गावच्या माता-भगिनीही उपस्थित होत्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 7 4 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे