युवक क्रांतिवीर पुरस्काराने आमदार प्रशांत बंब सन्मानित

छ. संभाजीनगर/आनिल वाढोणकर,दि.30
पूर्णवाद पॉलिटिकल सायन्स अकादमी तर्फे कै. उत्तमराव पवार स्मृति युवक क्रांतिवीर पुरस्काराने नुकतेच गंगापूर खुलताबाद मतदार संघाचे आमदार प्रशांत बंब यांना मुंबई वाशी येथील कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.
पूर्ण वेळ राजकीय क्षेत्रात निस्वार्थ, क्रांतिकारी काम करणाऱ्या नेतृत्वाला, लोकप्रतिनिधींना हा पुरस्कार दिला जातो. यंदाचा हा 9वा पुरस्कार असून तो आमदार बंब यांना देण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र असे आहे.
यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री गणेश नाईक, आमदार निलेश लंके, लक्ष्मिकांत दादा पारनेरकर , राहुल पाटील, शेखर चरेगावकर तसेच अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
गंगापूर तालुक्यातील गावात जल जीवन मिशन अंतर्गतही प्रत्येकाच्या घरात नळाद्वारे पाणी देण्यासाठी १०७८ कोटी रुपयांच्या योजना मंजूर करून या योजनेचे काम अतिशय चांगल्या प्रकारे सुरु असून अंतिम टप्प्यात आहे. मराठवाड्यातील पहिल्या गंगापूर उपसा जलसिंचन योजनेसाठी 600 कोटी रूपये मंजूर केले व या योजनेचे भूमिपूजन हजारो नागरिकांच्या उपस्थितीत आरापूर शिवार येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले व प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली. अशा अनेक योजना मतदारसंघात ते राबवित आहे. यासह त्यांनी नद्यांनाल्यांचे रुंदीकरण व खोलीकरण करून पाणी उपलब्ध केले.
अशा दुरदृष्टी असलेल्या आमदार प्रशांत बंब यांना पूर्णवाद परिवारातर्फे दिला जाणारा युवक क्रांतिवीर पुरस्कार हा युवकांच्यासाठी राजकारणाच्या माध्यमातून क्रांतिकारक काम करणाऱ्या नेतृत्वाला देण्यात येतो.
यंदाचा सन २०२४ चा पुरस्कार आमदार बंब यांना नवी मुंबई वाशी येथे सिडको कनव्हेक्शन येथे देण्यात आला याप्रसंगी नवी मुंबईचे पालकमंत्री गणेश नाईक लक्ष्मीकांत पारनेरकर व तसेच पारनेरचे आमदार निलेश लंके व पूर्णवाद परिवारातील सर्व युवक युवती उपस्थित होते.
या पुरस्काराबद्दल केंद्रीय मंत्री डॉ भागवत कराड, भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय खंबायते, जिल्हा परिषद सदस्य मधुकर वालतुरे, भाजपचे तालुका अध्यक्ष रवींद्र चव्हाण, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमोल जाधव, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती भाऊसाहेब पदार, माजी नगरसेवक प्रदीप पाटील, मारुती खैरे, दिपक साळवे, अशोक मंत्री, प्रशांत मुळे, अमोल शिंदे, दिनेश राऊत, अजय रासकर, निलेश डुकरे, रवी कुमावत, तेजस सोनवणे, संभाजी दांरुटे सचिन पांडे, संतोष काळे, बाळू शर्मा, अनिल मढीकर, सलीम भारातवाला, कुलदीप मांजरे, आदींसह मित्र परिवाराने अभिनंदन केले आहे.
प्रतिक्रिया :
हा पुरस्कारासाठी मला पात्र समजल्याबद्दल मी पूर्णवाद पॉलिटिकल अकादमीचे आभार मानतो. हा माझ्या आयुष्यातील मौल्यवान क्षण आहे. हा सन्मान माझा नसून खऱ्या अर्थाने माझ्या मतदार जनतेचा आहे. त्यांनी मला आजवर दिलेल्या प्रेमाचा आणि माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाची पावती आहे. पुरस्कार मिळणे भाग्याचे आहेच पण त्याहीपेक्षा जास्त मी तुमचा विश्वास कमवणे आणि प्रत्येक विकास कार्यात तुमची लाख मोलाची साथ मिळणे आणि कौतुकाची थाप पडणे हे मी माझे भाग्य समजतो, तुम्ही अशीच सदैव क्षणोक्षणी कौतुकाची थाप पाठीवर ठेवून मला फक्त लढ म्हणा अशी प्रतिक्रिया आमदार बंब यांनी यावेळी दिली.