काँग्रेसमध्ये युवकांना प्राधान्य : महेंद्रशेठ घरत
काँग्रेसच्या उरण तालुका शहराध्यक्षपदी गुफरान तुंगेकर यांची नियुक्ती

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.12
काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी गुफरान तुंगेकर यांची उरण तालुका शहराध्यक्षपदी एकमताने नियुक्ती केली. यावेळी महेंद्रशेठ घरत म्हणाले, “तुंगेकर यांनी गेल्या दहा वर्षांपासून काँग्रेसमध्ये चांगले काम केले आहे. युवकांना वाव दिला पाहिजे, या भूमिकेतून त्यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या मागे लोकांचा माहोल आहे. ते सर्वांना सांभाळून घेतात, काँग्रेसकडे युवकांना प्राधान्य देऊन नेतृत्वाची संधी दिली जाईल. उरण नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस आघाडी म्हणून वर्चस्व गाजवेल.”
सौरभ खरे आणि अनेक तरुणांनी आज ‘सुखकर्ता’ बंगल्यावर महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मिलिंद पाडगावकर यांनी त्यांचे स्वागत केले आणि त्यांचे अभिनंदन केले.
काँग्रेसचे उरण तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, माजी नगरसेविका अफशा मुखरी, निर्मला पाटील, चंदा मेवाशी, मार्तंड नाखवा, मुरलीधर ठाकूर, अखलाख शिलोत्री, अश्विन नाईक आणि अनेक काँग्रेस कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.