सर्वोत्कृष्ट मणी अबॅकस (Abacus) राज्यस्तरीय स्पर्धा उत्साहात संपन्न
जालना/प्रतिनिधी,दि.20
‘विश्वजीत एज्युकेशन हब’ तर्फे आयोजित Best BEADS Abacus राज्यस्तरीय स्पर्धा 2025 दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी भव्यदिव्य उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून 1000 हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री. बाळासाहेब खरात, (शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद जालना) यांनी भूषविले, तर श्री. सुनील बापू अर्दड , श्री संदीप सावळे सर (API) पोलिस प्रशिक्षण केंद्र ,जालना .प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
या स्पर्धेचे संपूर्ण आयोजन Vishwajeet Educational Hub च्या संचालिका सौ. अरुणा अर्जुन ठाकूर यांनी केले होते. स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना रोख रक्कम, ट्रॉफी, मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. मनिषा पाटील यांनी देखील कौशल्यपूर्णपणे केले.
जालना शहरात अशा प्रकारच्या राज्यस्तरीय व सुंदर आयोजन झाल्याने या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
