pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

श्रमिक संर्पक अभियाना निमित्त रायगड, पनवेल मध्ये कंत्राटी कामगारांचे मेळावा उत्साहात संपन्न

मुंबई, नवी मुंबई, रायगड जिल्ह्यातील कामगारांचा मोठया प्रमाणात सहभाग

0 3 1 2 8 3

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.13

भारतीय मजदूर संघ ७० वर्ष पूर्ण करत आहे. भारतीय मजदूर संघाचे संस्थापक श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडीजी यांनी आपले जीवन कामगार हितार्थ समर्पित केले कायम,कंत्राटी,संघटित,असंघटीत कामगारांचे नेतृत्व करत शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रहित उद्योगहित कामगार हित या त्रिसूत्रीवर काम करत त्याग तपस्या आणि बलिदान देणारे अनेक कार्यकर्ते संघाने घडवले. आज तीन कोटी पेक्षा जास्त सदस्य संख्या असलेले देशातील मजबूत व बलाढ्य असे हे संघटन आहे या मध्ये कंत्राटी कामगार, आऊटसोर्सिंस कामगार, बांधकाम कामगार, घरेलु कामगार , क़ायम कामगार, आदी कामगारांनी आपल्या न्याय हक्कांच्या करिता, अन्याय, शोषणा पासून मुक्त होण्यासाठी भारतीय मजदूर संघाच्या संघटनेत एकजुटीने सहभागी व्हावे असे आवहान रायगड जिल्हा मधील कोलाड व पनवेल येथे झालेल्या महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) च्या कामगार मेळावा मध्ये अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे व संघटनेचे सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी केले आहे. या वेळी मंचावर संघटनेचे संघटन मंत्री उमेश आणेराव, उपमहामंत्री राहूल बोडके, केंद्रीय उपाध्यक्ष कमाल खान, पुणे जिल्हा अध्यक्ष सुमीत कांबळे, रायगड जिल्हा सचिव सुधीर शिर्के उपस्थित होते.

भारतीय मजदूर संघाच्या वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने १ ते २० डिसेंबर २०२४ या कालावधीत श्रमिक संपर्क अभियान आयोजित केले आहे. तळागाळातील शोषित पीडित वंचित कामगारांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या समस्यां जाणून घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जाऊन कामगारांशी संवाद साधणार आहे , संघटनेचे अध्यक्ष नीलेश खरात यांनी संभाजी नगर,जालना,नांदेड,मराठवाडा विभागातील कामगारांच्या मेळावाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

मागील सरकार काळात संघटनेने सतत संघर्ष केल्या या मुळेच तिन्ही कंपनीतील कंत्राटी कामगारांना १९% पगार वाढ, पगारवाढीचा फरक, भरतीमध्ये वयात सवलत, जादा १० गुण, अपघाती मृत्यू पश्चात वारसाला ४ लाख आर्थिक निधी, ५ लाख रुपयांचे विमा कवच, राष्ट्रीयकृत बँक वेतन खाते, आय टी आय करण्यास मुदत वाढ असे अनेक लाभ ४२००० कंत्राटी कामगारांना मिळवून दिल्याने कामगारांना निश्चितच दिलासा मिळाला आहे.

नवीन सरकार मधील ऊर्जामंत्री व कामगार मंत्री हे आगामी काळात देखील नक्कीच सहकार्य करून संघटीत असंघीटत क्षेत्रातील कामगारांच्या प्रलंबित समस्यांवर निश्चितच तोडगा काढतील असा विश्वास उमेश आणेराव व राहूल बोडके यांनी व्यक्त केला आहे.रायगड जिल्हा, नवी मुंबई विभागातील कंत्राटी कामगारांच्या समस्यावर आवाज ऊठवणार असे मनोगत कमाल खान यांनी केले आहे. रायगड जिल्हा मधील सर्व कामगारांनी एकजुटीने भारतीय मजदूर संघाच्या संघटनेत सहभागी व्हावे असे आवाहन भारतीय मजदूर संघ जिल्हा सचिव अशोक निकम यांनी केले आहे.मेळावाचे सुत्रसंचालन सुधीर शिर्के व आभार प्रदर्शन सुधीर शिर्के यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 1 2 8 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे