ग्रामसुधारणा मंडळ बोकडविराची नवीन कार्यकारिणी जाहीर.
नवनियुक्त पदाधीकाऱ्यांवर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.9
गुढीपाडव्याच्या शुभ दिनी परंपरेनुसार बोकडवीरा गावातील गणेश मंदिर येथे पंचांग वचन व ग्राम सुधारणा मंडळाची नवीन कार्यकारणी निवड संदर्भात ग्रामस्थांची बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. पुढील वर्षाचा पंचांग वाचन झाल्यानंतर ग्रामस्थांच्या सूचनेनुसार व मागणीनुसार उरण पोलीस ठाणे येथील पोलीस अधिकारी यांच्या समक्ष नवीन बोकडविरा ग्राम सुधारणा मंडळाची कार्यकारणी निवड करण्यात आली. सदर कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी सूर्यकांत लहू पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सेक्रेटरी पदी श्रीकांत पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्याचबरोबर कार्यकरणीची निवड बिनविरोध करण्यात आली. यावेळी जवळपास १९० ग्रामस्थ उपस्थित होते. सर्व ग्रामस्थांनी नवीन कमिटीचे अभिनंदन केले व पोलीस प्रशासनाचे आभार मानून सभा संपन्न झाली.
—————————————————————-
नवीन कार्यकारिणी खालीलप्रमाणे :-
ग्रामसुधारणा मंडळ बोकडविरा (कमिटी – २०२४-२५)
अध्यक्ष-सुर्यकांत लहू पाटील,
उपाध्यक्ष-गिरीष नामदेव म्हात्रे, विकास रमेश पाटील, प्रशांत कमळाकर पाटील.
सेक्रेटरी -श्रीकांत चंद्रकांत पाटील,
कार्याध्यक्ष- जगदीश पांडूरंग भोईर, किरीट प्रभाकर पाटील, संदिप रामदास पाटील.
खजिनदार-विद्याधर शशिकांत पाटील.
सहखजिनदार – नितीन धर्मराज म्हात्रे, करण हरिश्चंद्र पाटील.
सहसेक्रेटरी- जिवन रमाकांत पाटील, राकेश परशुराम म्हात्रे, जितेंद्र अनंत पाटील.
ऑडिटर- चेतन रमेश ठाकूर, ईश्वर हिरामण पाटील,रितेश कमळाकर पाटील.
सल्लागार- यशवंत हरिश्चंद्र ठाकूर, जयवंत लहू पाटील, दिनानाथ पांडूरंग पाटील, राजेंद्र बाबुराव पाटील.तसेच पंच कमिटी मध्ये विविध मान्यवरांची नियुक्ती करण्यात आली.नवनियुक्त सर्वच पदाधिकारी सदस्य यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.