तोष्णीवाल महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा सत्कार

हिंगोली/प्रतिनिधी,दि.4
सेनगाव: येथील तोष्णीवाल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील माजी विद्यार्थी सतिष प्रल्हाद राठोड आणि सुनील मांगीलाल चव्हाण दोघेही रा. लिंबाला तांडा यांची एस. आर. पी. एफ. (राज्य राखीव पोलीस दल) मुंबई येथे नुकतीच नियुक्ती झाली. महाविद्यालयाचे विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील पदवीधर विद्यार्थी असून त्यांनी अथक परिश्रम आणि पराकाष्ठा करून पोलीस दलामध्ये भरतीसाठी आवश्यक शरीरिक तसेच लेखी परीक्षा उत्तीर्ण केली, महाविद्यालयाच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. श्रीपाद तळणीकर तसेच प्रा डॉ संजीव कुमार अग्रवाल, डॉ. प्रवीण तोतला, डॉ. शंकर पजई, डॉ. निखिलेश बजाज, डॉ. संदीप मरकड, डॉ. राजेश जोशी, प्रा. प्रमोद घन, श्री प्रशांत चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.