pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

सुमित थळे यांनी यशस्वी समाजबांधव व्यवसायिकांचा केला संघटनेच्या वतीने विशेष सन्मान !

0 1 1 8 2 2

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.26

ध्यास समाजाच्या अस्तित्वाचा ! हेच धेय्य उराशी बाळगत भूमिपुत्र समाज बांधवांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना म्हणून अल्पावधीतच नावारूपाला आलेली संघटना म्हणजेच आगरी, कोळी, कराडी संघर्ष सामाजिक संस्था. याच संघटनेच्या वतीने संघटनेचे उरण तालुका अध्यक्ष सुमित थळें यांच्या आयोजनातून मुळेखंड – करंजा रोड उरण येथील आगरी ढाबा या हॉटेलच्या भव्य हॉल मध्ये ‘सन्मान समाज बांधवांचा’ या विशेष अशा पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमा अंतर्गत विशेष सत्कारमूर्ती म्हणून आगरी, कोळी, कराडी समाजातील विविध उद्योग व्यवसाय क्षेत्रात आपल्या नावाचा ठसा उमटवणारे नवउद्योजक जिगनु चिंतामण कोळी( शिक्षण कोचिंग क्लासेस व्यवसाय क्षेत्र ),पायल विलास पाटील (युट्यूब फेम कलाकार ), गिरीष प्रभाकर म्हात्रे ( हॉटेल व्यावसायीक),प्रशांत रघुनाथ म्हात्रे ( मटण,चिकन खाटीक व्यवसाय ),अजित हरिश्चंद्र म्हात्रे( चिकन विक्री व्यावसायीक )या पाच रत्नांना ‘सन्मान समाज बांधवांचा’ हा मानाचा पुरस्कार शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

आपल्या स्वकर्तुत्वाच्या बळावर सामान्य व्यक्ती ते यशस्वी उद्योजक,व्यावसायिक असा प्रवास करून आगरी, कोळी, कराडी समाजाच्या प्रगतीस हातभार लावून समाजातील होतकरू युवा तरुण – तरुणींना प्रेरणा देणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा सन्मान करून खऱ्या अर्थाने आगरी,कोळी, कराडी समाजातील तरुण – तरुणींना एक संदेश दिलाय की आता नोकऱ्यांच्या मागे न पळता नोकरी करून नोकरदार नाही बनायचं तर उद्योग व्यवसाय करून मालक बनायचं ! हाच पक्का निर्धार मनाशी बाळगून अंगात असणाऱ्या कला – कौशल्याचा योग्य तो उपयोग करत हिम्मतीने खंबीरपणे उभं राहून उद्योग व्यवसायात आपल्या नावाचा एक ब्रंड निर्माण करून आपलं नावं मोठं करावं!असा चांगला संदेश या कार्यक्रमातून समाजात गेला आहे.

आगरी, कोळी, कराडी संघर्ष सामाजिक संस्था उरण तालुका विभागाच्या वतीने आणि उरण तालुका अध्यक्ष सुमित दादा थळे यांच्या आयोजनातून साकारलेल्या ‘सन्मान समाज बांधवांचा’ या कार्यक्रमा करिता प्रमुख मान्यवर पाहुणे म्हणून आगरी , कोळी, कराडी संघर्ष सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष रोहन पाटील उरण तालुका अध्यक्ष सुमित थळे,उरण तालुका सचिव अनिल घरत,नवघर विभाग अध्यक्ष भूपेंद्र पाटील, मुळेखंड गावातील जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रकाश म्हात्रे,कार्याध्यक्ष अनंत पाटील,मुळेखंड कोळीवाडा गावं अध्यक्ष हितेश म्हात्रे,उपाध्यक्ष जगदीश म्हात्रे,खजिनदार चेतन म्हात्रे सदस्य स्नेहलजी कडू, अमोल पाटील, संतोष म्हात्रे,वैभव म्हात्रे,अतिश म्हात्रे,किशोर पाटील तसेच मुळेखंड कोळीवाडा,कुंभारवाडा गावं कमिटी, आगरी, कोळी कमिटी यांच्या उपस्थितीत हा अनोखा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाचं सूत्रंचालन संघटनेचे कार्याध्यक्ष रोहन पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन संघटनेचे उरण तालुका अध्यक्ष सुमित थळे यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 2 2