pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

101-जालना विधानसभा मतदार संघातून अर्जुन पंडीतराव खोतकर विजयी

0 3 1 0 6 3

जालना/प्रतिनिधी, दि.24

 विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 101-जालना मतदार संघाची मतमोजणी प्रक्रिया आज येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जालना येथे पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमंत हारकर यांनी मतदारसंघाचा निवडणूक निकाल जाहीर केला. 101-जालना विधानसभा मतदारसंघातून शिवसेना पक्षाचे उमेदवार अर्जुन पंडीतराव खोतकर यांना 1,04,654 मते मिळाली. तर इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाचे उमेदवार कैलास किसनराव गोरंट्याल यांना 76,014 इतकी मते मिळाली. यात शिवसेना पक्षाचे उमेदवार अर्जुन पंडीतराव खोतकर हे 31,651 मतांनी विजयी झाल्याचे घोषीत करुन निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमंत हारकर यांनी अर्जुन पंडीतराव खोतकर यांना निवडणूक प्रमाणपत्र देवून त्यांचे अभिनंदन केले.

यावेळी निवडणूक निरिक्षक श्री. वेद पती मिश्र, निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमंत हारकर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी छाया पवार यांची उपस्थिती होती.

101-जालना विधानसभा मतदारसंघातून एकुण 26 उमेदवार निवडणूकीत सहभागी झाले होते. या सर्व उमेदवारांना खालील प्रमाणे मते  प्राप्त झाली आहेत.

 

.क्र. उमेदवारांचे नांव पक्ष मिळालेली मते
1 अर्जुन पंडीतराव खोतकर शिवसेना 1,04,665
2 किशोर यादव बोरुडे बहुजन समाज पार्टी 900
3 कैलास किसनराव गोरंट्याल इंडियन नॅशनल काँग्रेस 73,014
4 असद उल्ला शेख अमान उल्ला शहा- सोशल डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडिया 869
5 डेव्हीड प्रल्हादराव घुमारे वंचीत बहुजन आघाडी 6,322
6 निला गौतम काकडे विकास इंडिया पार्टी 131
7 मिलींद बालू बोर्डे बहुजन रिपब्लीकन सोशलीस्ट पार्टी 363
8 ॲड. योगेश दत्तु गुल्लापेल्ली ऑल इंडिया फॅारवर्ड ब्लॉक 92
9 विकास छगन लहाने पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डे.) 149
10 विजय पंडितराव वाडेकर संभाजी ब्रिगेड पार्टी 131
11 विनोद राजाभाऊ मावकर राष्ट्रीय समाज पक्ष 98
12 अनवर कुरेशी सलीम कुरेशी अपक्ष 108
13 अनिस शमशोद्यीन सय्य्द अपक्ष 157
14 अफसर फरीद शेख चौधरी अपक्ष 528
15 अब्दुल हफीज अब्दुल गफार अपक्ष 30,454
16 अर्जुन दादा पाटील भांदरगे अपक्ष 985
17 अर्जुन सुभाष कणिसे अपक्ष 688
18 अशोक उर्फ लक्ष्मीकांत मनोहर पांगारकर अपक्ष 2,227
19 आनंदा लिंबाजी ठोबरे अपक्ष 270
20 कुंडलिक विठ्ठल वखरे अपक्ष 118
21 गणेश दादाराव कावळे अपक्ष 108
22 योगेश सखाराम कदम अपक्ष 103
23 रतन आसाराम लांडगे अपक्ष 51
24 विशाल लक्ष्मण हिवाळे अपक्ष 123
25 सपना विनोद सुरडकर अपक्ष 101
26 ॲड. संजय रघुनाथ रौंदळे अपक्ष 372
27 नोटा 813

 

****

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 1 0 6 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
बातमी देण्यासाठी येथे क्लिक करा
15:15