रेशनदुकानदाराच्या घरावर दरोडा,साडेसात लाखाचा ऐवज लंपास,दरोडेखोर सीसी टीव्ही मध्ये कैद.
जालना/प्रतिनिधी:दि.12
जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील काजळा या गावात चोरट्याने गावातील विलास गावडे यांच्या घरावर दरोडा टाकत घरात प्रवेश करून कपाटात आणि लाकडी पेटित ठेवलेले रोख साडे तीन लाख, आणि कपाटातील चार लाखाच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारत, साडेसात लाखाचा ऐवज लंपास केलाय, भर वस्तीत झालेल्या या धाडसी चोरी मुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे, या चोरट्यानी गावात दोन ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्नही केला आहे, हे चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले असून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी श्वान पथकाच्या माध्यमातून या चोरट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र श्वान परिसरात घुटमळल्याने पोलिसही चक्रावले आहे.
घराचे मालक विलास गावडे हे बाहेरगावी गेले असल्याने ते जेव्हा परत आले तेव्हा त्यांनी रीतसर अज्ञात चोरट्या विरुद्ध बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
विलास गावडे यांच्या म्हणण्यानुसार
कोणीतरी अज्ञात चोरटयानी माझ्या घरात चैनल गेटचे कुलूप तोडुन आत प्रवेश करुन पाठीमागील रुमचे कुलुप तोडून त्यामध्ये असलले कपाटातील, गल्ल्यातील रोख रक्कम, संदुक उचलून नेऊन त्यामधील सोन्या चांदीचे दागीने चोरून नेले आहे. याचे वर्णन खालील प्रमाणे 3,80,000/- एक सोन्याचे नेकलेस वजन 20ग्रॅम, सोन्याचे शॉट गंठन 10 ग्रॅम,झुंबर व वेल वजन 15 ग्रॅम, गळ्यातील सोन्याच्या मन्याची पोत वजन 10 ग्रॅम, ठूशी 3 ग्रॅम,तीन लहान मुलाच्या अंगठ्या वजन,गळयातील ओम वजन 1ग्रॅम, कानातील रिंग वजन 2 ग्रॅम, नाकातील तीन मोरणी वजन1ग्रॅम,आई यमुनामाई यांच्या गळ्यातील सोन्याचे मण्याची पोत वजन10 ग्रॅम, माझ्या वडीलाच्या 4 सोन्याच्या अंगठ्या ज्यात 1 बदामी व 1 रिंगाच्या वजन 10 ग्रॅम,एक सोन्याचे लॉकेटट 10 ग्रॅम, किंमत अंदाजे असे सोन्याचे दागीने वजन 94 ग्रॅम,2000/-रुपाये ज्यामध्ये पत्नी हिये पायातील पाच भाराचे चांदीचे जोडवे किंमत व वजन अंदाजे, 3,50,000/-रुपये यामध्ये कर्जाची रक्कम भरण्यासाठी नातेवाईकांकडून आनुन ठेवलेली रक्कम ज्यामध्ये 2000, 500,100 रुपये दराच्या नोटा एकुण 7,32,000/- रुपये ऐवज. वर लावलेल्या CCTV फुटेजची पाणी केली असता CCTV फुटेजमध्ये तीन जन 20 ते 25 वयोगटातील तोंडाला रुमाल बांधलेले दिसून आले आहे. दि 12/9/2020 रोजी रात्रीचे 2.00 ते 3.00 वाजेच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात तीन चोरट्यांनी माझ्या घराचे चॅनेलगेटचे कुलप तोडून आत प्रवेश करून पाठीमागील रुम मधील कपाटातील, गल्ल्यातील रोख रक्कम व संदुक उचलुन नेऊन वरिल वर्णनाचे सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम असे एकुण 7.32.000/- ऐवज चोरुन नेला आहे.
अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक पूजा पाटील करीत आहे.