अपघात ग्रस्त तृतीय पंथी गुलबा ला मदतीचा गरज

हदगाव/प्रभाकर डुरके,दि.30
पळसा ता.हदगांव येथील तृतीय पंथी गुलबा केशव धवसे चे आई वडील वयोवृद्ध असून परीस्थीतीनुसार मिळेल ते मजुरी काम करतात. वडील सध्या आंध्रप्रदेश मध्ये कामास गेले आहे. गुलबा कोठेही फिरुन मागत नाही.तर विविध कार्यक्रमातून मिळालेल्या मदतीतुन आपल्यासह कुटुंबासाठी सहकार्य करते.यामुळे मदतीबाबत कधीही गरज भासली नाही.मागील चार महिन्यांपुर्वी मोटारसायकल वरुन पडल्याने पायाला मार लागला असून पळसा सह नांदेड येथील आधार या खाजगी दवाखान्यात योजनेत बसला नसल्याने एक लाखाहुन अधिक खर्च लागला. परीस्थीती लक्षात घेता गुलबा खूप अडचणीत सापडला असल्याची माहिती पळसा ता.हदगांव येथील सामाजिक कार्यकर्त्या सवीताताई विनोद निमडगे यांनी आपल्या ग्रुप कडुन काही तरी मदत मिळेल या अपेक्षेने माहिती दिली आहे.आपण अनेक मदतीतुन गरजुच्या गरजा भागवल्या असून पहिल्यांदा तृतीय पंथी चा विषय समजतात मी व प्रभाकर दहीभाते यांनी प्रत्यक्ष भेटून माहीतीही घेतली असून या गरजु कुटुंबासाठी शक्य असेल त्यांनी मदत करीत सहकार्य करावेत हि विनंती