“उरण मध्ये राबविण्यात येत आहे शालेय, महाविदयालयीन पुस्तके मोफत देण्याचा उपक्रम “!

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.24
आपल्या मुलांची पुस्तके – रद्दी मध्ये न देता आपल्या उरणमधील ईतर विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देऊया आणि आपल्याला पुढील वर्षांकरिता / पुढील ईयत्तेमध्ये आवश्यक असणारी पुस्तके आपण मिळविण्यासाठी प्रयत्न करुया ! असे आवाहन उरण मधील सामाजिक कार्यकर्ते, विविध सामाजिक संस्था संघटना कडुन करण्यात येत असून उरण मध्येही सामाजिक बांधिलकी जपत गोर गरीब विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मोफत पुस्तके उपलब्ध व्हावीत,आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये यासाठी उरण मधील विविध सामाजिक कार्यकर्ते एकत्र आले आहेत. व त्यांनी पालकांना आपली शालेय तसेच महाविद्यालयीन पुस्तके रद्दी मध्ये न विकता गोर गरीब वंचित असलेल्या मुलांना मोफत पुस्तके देण्याचे आवाहन केले आहे.हा उरण तालुक्यातील विद्यार्थ्यांकरिता एक पहिला प्रयत्न आहे .पालकांच्या सहकार्यामुळेच हा उपक्रम यशस्वी होणार आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यांच्या कडील पुस्तके मोफत देऊन सहकार्य करावे तसेच ज्यांना मोफत पुस्तके हवी आहेत त्यांनी पुस्तके मोफत मिळविण्यासाठी खालील व्यक्ती / मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावे असे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क :–
श्री.घनःश्याम कडू 9223377800,
श्री. विरेश मोडखरकर 9930741999,
श्री. नंदन पानसरे 9653375621,
श्री. सचिन वर्तक 9870231123,
श्री. महेंद्र म्हात्रे 8369400693,
श्री विष्णू महतो 9326074219,
श्री. किरण कोळी 8850980772,
श्री. वैभव पाटील 9920960230,
श्री सुधर्म घरत 8830088688,
श्री. संतोष पवार 9137575449