pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

निवडणूकीमधील जप्तीच्या व्यवस्थापन प्रक्रियेबाबत प्रशिक्षण व आढावा संपन्न

0 1 7 4 0 5

जालना/प्रतिनिधी,दि.24

भारत निवडणूक आयोगाने निवडणूकीमधील जप्तीच्या व्यवस्थापन प्रक्रियेबाबत दि.19 जानेवारी 2024 रोजी गुजरात येथे प्रत्यक्ष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणास ऑनलाईन पध्दतीने महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हा निवडणूक अधिकारी, राष्ट्रीय स्तरावरील मास्टर्स ट्रेनर्स व राज्य स्तरावरील मास्टर्स ट्रेनर्स, जिल्ह्यातील संबंधित अधिकारी उपस्थित होते. तरी या विषयाची माहिती जिल्हास्तरावरील संबंधित अधिकाऱ्यांना व्हावी या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात निवडणूकीमधील जप्तीच्या व्यवस्थापन प्रक्रियेबाबतचे प्रशिक्षण व आढावा बुधवार दि.24 जानेवारी 2024 रोजी दुपारी 3 वाजता घेण्यात आला. या प्रशिक्षणास व आढावा बैठकीस जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, अपर पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल यांच्यासह संबंधित यंत्रणेच्या प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे