बजाजनगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात स्व-संरक्षण काठीचे प्रशिक्षण

छ.संभाजीनगर/आनिल वाढोणकर,दि.24
बजाजनगर : येथील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात श्री गुरूपीठाचे पिठाधिष परमपूज्य गुरुमाऊली श्री. अण्णासाहेब मोरे यांच्या आदेशानुसार व गुरूपुत्र आदरणीय नितीनभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली बालसंस्कार विद्यार्थी, युवक – युवती व महिला यांच्यासाठी दिनांक २३ जुलै २०२३ रोजी एकदिवसीय स्व-संरक्षण काठीचे प्रशिक्षण देण्यात आले.दिल्ली येथील अत्याचाराची घटना, मनीपूर येथील झालेला अत्याचार व यासारख्या भुतकाळातील अनेक घटनांचा आढावा घेता आज प्रत्येक स्त्री, युवती यांच्यामधे स्वतःसाठी असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. आज युवती,महिला प्रत्येक क्षेत्रात पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. परंतू असुरक्षितता ही त्यांच्या प्रगतीच्या मार्गातील खूप मोठा अडथळा आहे. या अनुषंगाने परमपूज्य गुरुमाऊली श्री. अण्णासाहेब मोरे यांच्या आदेशानुसार प्रत्येक स्त्रीला आणीबाणीच्या प्रसंगी आलेल्या संकटाशी दोन हात करून स्वतःचे संरक्षण स्वतः करण्यासाठी स्व-संरक्षण काठीचे निर्माण करण्यात आले. आदरणीय गुरुपुत्र नितीनभाऊंच्या मार्गदर्शनाखाली श्री गुरूपीठ येथील तज्ञ प्रतिनिधींनी बजाजनगर सेवा केंद्रात उपस्थित राहून सर्व महिला, युवती, युवक व बालसंस्कार विद्यार्थी यांना स्व-संरक्षण काठीचे प्रशिक्षण दिले. सदरील प्रशिक्षण हे विनामूल्य सर्वासाठी अयोजीत केले होते. प्रशिक्षणाचा बजाजनगर तसेच छत्रपती संभाजीनगर येथील व बजाजनगर पंचक्रोशीतील एकूण ४८६ प्रशिक्षणार्थींनी लाभ घेतला.उपक्रम यशस्वी होण्यासाठी बजाजनगर येथील बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागातील प्रतिनिधी व सेवेकऱ्यांनी आपली सेवा सुरू केली.