लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक हे भारताचे दोन रत्न

जालना/प्रतिनिधी, दि.1
जालना तालुक्यातील राजर्षी छञपती शाहू महाराज विद्यालय डुकरी पिंपरी,ता.जि.जालना या शाळेत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सी.जी.वाघमारे.व शिक्षक व शिक्षकेत्तर वृंद यांच्या हस्ते प्रतिमापुजन करण्यात आले.यावेळी कु.आरती जाधव,प्रिया जाधव,श्रध्दा डुकरे,नेहा जाधव या विद्यार्थांनी आपल्या मनोगतात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्याविषयी माहीती दिली त्यांना वर्गशिक्षक श्रीमती.एस.आर.कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले व कार्यक्रमांचे प्रमुख पाहूने शाळेचे जेष्ठशिक्षक डी.एन.सोनकांबळे यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले ते बोलताना म्हणाले की “नैराश्य हे तलवारीवर साचलेल्या धुळीसारखे असते,धुळ झटकली की ती तलवार पुन्हा धारदार बनते”
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
१आँगस्ट_मराठी_भाषा_दिवस…
म्हणजेच साहीत्यसम्राट,शोषीत कष्टकरी शेतकरी सामान्य जनांना आपल्या लेखणीचा नायक करणारे,शिवशाहीर,सत्यशोधक,आधुनिक तुकाराम,३३कादंबऱ्या, ३नाटके,१प्रवास वर्णन,१३कथा संग्रह,१३ लोकनाट्य,७लेखनावर आधारीत चित्रपट…विपूल लेखणीचे धनी अण्णा उर्फ तुकाराम भाऊ साठे यांच्या जयंतीच्या हार्दीक शुभेच्छा दिल्या….
तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सी.जी.वाघमारे. यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले त्यापुढे ते बोलतांना म्हणाले की,भारत हा देश रत्नांचा देश आहे.या रत्नामधले सर्वात महान रत्न म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक होय.या दोन्ही रत्नांनी आपल्या जीवनामध्ये सतत संघर्ष करून सामान्य लोकांना सन्मानाने जगण्याची सवय लागली.या दोन्ही रत्नांचे चरिञ आपण अभ्यासले पाहीजे.असे आवाहान त्यांनी केले.व कार्यक्रमांचे सुञसंचलन व आभार प्रदर्शन आर.एस.ठाकरे यांनी केले.यावेळी उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक सी.जी.वाघमारे.,श्रीमती.एस.आर.कुलकर्णी.,वाय.बी.मदन.,डी.एन.सोनकांबळे.,पी.पी.नागरे.,एल.बी.जाधव.आर.एस.ठाकरे.,एस.बी.राऊत.,श्रीमती.एम.ए.खरात व ग्रामस्थ उपस्थित होते…