सोमवारी लोकशाही दिनाचे तहसील कार्यालयात आयोजन

जालना/प्रतिनिधी,दि.12
सामान्य प्रशासन विभागाने तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन महिन्याचे तिसऱ्या सोमवारी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुषंगाने तहसील कार्यालय जालना येथे तालुकास्तरीय लोकशाही दिन सोमवार दि. 17 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती तहसीलदार, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
लोकशाही दिनासाठी अर्जदारांनी अर्ज विहीत नमुन्यात 15 दिवस आधी 2 प्रतित पाठवणे आवश्यक आहे. या लोकशाही दिनामध्ये अर्ज देताना त्यांनी संबंधित तालुक्यातील तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिनामध्ये अर्ज दिलेला असावा. या तालुकास्तरीय लोकशाही दिनात एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी होवून देखील कोणतीही कार्यवाही झाली नाही अशाच अर्जदाराने टोकन क्रमांकाच्या पावतीसह विहीत नमुन्यात दोन प्रतीमध्ये अर्ज सादर करावा. तसेच ज्या अर्जदाराने तालुकास्तरीय लोकशाही दिनात भाग घेतला नाही अशा अर्जदाराचे अर्ज स्विकारले जाणार नाहीत. लोकशाही दिनात न्यायप्रविष्ट प्रकरणे, राजस्व व अपील, सेवाविषयक आस्थापना विषयक बाबी, विहीत नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रती न जोडलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. तालुकास्तरीय लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाची तहसीलदार यांच्या स्वाक्षरीची पोच पावती व त्यासाठी दिलेल्या मुदतीत व नमुन्यात ज्यांनी या पुर्वीच्या आवश्यक कागदपत्रासह अर्ज केले असतील त्यांना तक्रार मांडता येईल तसेच ज्यांनी यापुर्वी जिल्हास्तरावरील लोकशाही दिनी तक्रार अर्ज दिलेला आहे. परंतू अद्याप कार्यवाही झालेली नाही, अशा तक्रारदारांनी पुन्हा अर्ज करू नये. लोकशाही दिन विहीत नमुन्याचा अर्ज https://jalna. nic. in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. असेही कळविले आहे.