pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक रिंगणात सावता महासंघ उतरणार

संतोष अण्णा डोंगरखोस संस्थापक अध्यक्ष सावता महासंघ महाराष्ट्र राज्य यांचे प्रतिपादन

0 1 7 4 1 4

सिंधीकाळेगाव/श्याम गिराम,दि.19

भविष्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये सावता महासंघाचे संस्थापक अध्यक्ष श्री संतोष अण्णा डोंगरखोस यांच्या मार्गदर्शनाखाली सावता महासंघाच्या जालना जिल्हा तथा मराठवाड्यातील काही निवडक पदाधिकारी तरुण कार्यकर्त्यांना विविध राजकीय पक्षांकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक रिंगणात उतरवण्याचा निर्णय सावता महासंघाच्या त्रैमासिक पदाधिकारी बैठकीत घेण्यात आला.सविस्तर असे की सावता महासंघाचे जालना जिल्हा तथा परभणी बुलढाणा हिंगोली धुळे संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये प्रभावी काम आहे सावता महासंघाचे पदाधिकारी तरुण सामाजिक कार्यकर्ते आहेत ते सक्रिय राजकारणात विविध पक्षांमध्ये काम करतात अशा कार्यकर्त्यांना सावता महासंघाच्या वतीने विविध राजकीय पक्षाच्या माध्यमातून या निवडणूक रिंगणात उभे करण्याचा निर्णय सावता महासंघाचे राज्य संपर्क कार्यालय सावता निवास या ठिकाणी त्रैमासीक बैठकीमध्ये संस्थापक अध्यक्ष संतोष अण्णा डोंगरखोस यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी बांधवांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आला.याबद्दल सावता महासंघाच्या या निर्णयाचे माळी समाजातून सर्वत्र स्वागत होत आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे