pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मानसिक आरोग्य जनजागृती

0 1 7 4 1 5

गोलापांगरी/प्रतिनिधी, दि.17

आज (दि.17) रोजी गोलापांगरी शिक्षण प्रसारक मंडळ गोलापांगरी अंतर्गत नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गोलापांगरी
विद्यालयात मानसिक आरोग्य जनजागृती महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग जालना. अंतर्गत शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय श्रीमती अनिता कुलकर्णी मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करून श्रीमती शिंनगारे मॅडम (सामाजिक कार्यकर्ती ) यांनी मुलांना मार्गदर्शन करताना मानसिक आजार व शारीरिक आजार यांचे महत्त्व विशद करताना – शरीरिक आजार म्हणजे शरीरावरून जे आजार दिसतात , परंतु मानसिक आजार दिसत नाही.
मानसिक आजाराची लक्षणे पाहत असताना एकांत वास, सतत रडणे, सतत मोबाईल पाहणे, सतत संताप, चिडचिडणे इत्यादी.
संशय वृत्ती,भ्रमिष्टपणा हे मानसिक आजाराचे मुख्य लक्षण आहे, व्यसन हाही मानसिक आजाराचा प्रकार आहे पण अभ्यास करणे हे व्यसन नाही.
दारू,तंबाखू, नशिले पदार्थ यांचे व्यसन लागले तर मानसिक आजार निर्माण होतात,
ताणतणाव ( डिप्रेशन ) हेही मानसिक आजाराचे लक्षण आहे.
मानसिक आजार नीट होतो जालना येथील सरकारी हॉस्पिटल ओपीडी नंबर ०६ येथे या रुग्णावर उपचार होतात व मानसिक रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो. श्रीमती शिनगारे मॅडम यांनी या आजारावर अनेक उदाहरणे व दाखले दिले.
श्रीमती जया मघाडे ( सामाजिक परिचर्या ) यांनीही -मानसिक आरोग्य जनजागृती-या मोहिमेअंतर्गत मानसिक आजार व शारीरिक आजार यांचे अनेक उदाहरणे दिले.
आभार व्यक्त करताना श्रीमती एस. एस .कुलकर्णी मॅडम यांनी आपल्या मनोगतात मोबाईल पासून दूर राहावे,विविध असणारे व्यसन याही पासून मुलांनी दूर राहावे. आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, विद्यार्थी जीवनामध्ये अभ्यासाचेच व्यसन लावावे, आपले आरोग्य निरोगी व सुदृढ ठेवावे यासारखा मोलाचा उपदेश केला.
या कार्यक्रमासाठी पर्यवेक्षक श्रीयुत आत्माराम मोरे सर,अनेक सहकारी बंधू-भगिनी व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे