ओबीसी आरक्षण बचावासाठी जालना जिल्ह्यातील उपोषणाला हदगांव तालुक्यातील समाज बांधवाचा पाठिंबा

हदगाव/प्रभाकर डुरके,दि.20
ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी जालना जिल्ह्यात प्राध्यापक लक्ष्मण हाके व सहका-याचे गेल्या सहा दिवसापासून उपोषण सुरूच आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी सुरु असलेल्या उपोषणाला महाराष्ट्रातील ओबीसी समाजाकडून पाठींबा मिळत असुन हदगाव तालुक्यातील ओबीसी समाजही सरसावला आहे.उपोषणाच्या सहाव्या दिवशी हदगांव तालुक्यातील शिष्टमंडळाने जालना जिल्ह्यात उपोषण स्थळी भेट देऊन पाठींबा दिला.
यावेळी शिष्टमंडळात बालाजी खर्डे चिंचगव्हान,बाळासाहेब पाटील , काशीबा मोहन वाकोडे, ओमप्रकाश येवले पिंपरखेडकर ,बळीराम आनेराव करमोडीकर,अवधूत चोंढेकर रुईकर,गजानन जिद्देवार आष्टिकर ,विठ्ठलराव मस्के पळसेकर,बाळु ढोरे हदगांवकर उपस्थित होते.