शिव मावळ्यांनी साकारली मिठा पासुन ३९ x २४ फुटाची छत्रपती शिवाजी महाराजांची रांगोळी.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि,.20
शिवरायांना मानवंदना म्हणून उरण तालुक्यातील पागोटे गावात शिव मावळ्यांनी मिठा पासुन ३९ x २४ फुटाची छत्रपती शिवाजी महाराजांची रांगोळी साकारली आहे.सदर रांगोळीसाठी ५५० किलो मिठ, ५५ किलो रंग, आणि १२ तासांचा वेळ लागला आहे. सदर रांगोळी काढण्यासाठी कलाकार – नकुल य. पाटील, संतोष का. पाटील, पंकज ह. पाटील, भावेश शेळके, दिपक निनावे, विशाल अ. तांडेल, धिरज भ. पाटील,छोटे कलाकार – नक्ष जि.पाटील, मंथन वि. पाटील, यश ह. पाटील, हर्षित म. पाटील, नेहाल म. जोशी, धैर्य म. पाटील, केतन मोहिते, साई ग. पाटील, विर ग. पाटील, दिव्यांशू वि. पाटील, सक्षम यो. पाटील, भुमीराज नि. पाटील,सहाय्यक – गणेश पाटील, विनय पाटील, हरिश्चंद्र पाटील, ऋषी भोईर, श्यामकांत मोकल (वेश्वी)या सर्वांनी विशेष मेहनत घेतली आहे.रांगोळीमध्ये बंदुक व नांगर काढून भारतीय जवानांना व किसानांना अभिवादन केले असून कुलवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज अशी घोषणा दिली आहे. पागोटे गावातील तरूण दर वर्षी वेगवेगळी रांगोळी काढून शिवरायांना मानवंदना करतात.दरवर्षी काढण्यात येणारी रांगोळी ही आदर्श व सर्वांना प्रेरणा देणारी असते.यावर्षी काढण्यात आलेल्या रांगोळीचे शिव भक्तांनी, नागरिकांनी तोंड भरून कौतुक केले आहे.