उरणच्या अमेघा घरतने परेश शेठ केसरी २०२५ स्पर्धेत सलग तिसऱ्या वर्षी मिळवली मानाची गदा

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.21
उरण तालुक्यातील खोपटें गावची कुस्तीपटू अमेघा घरत हिने सलग तिसऱ्यांदा अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत मानाची गदा पटकावली आहे. सदर कुस्ती स्पर्धा परेश शेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त १८ मे २०२५ रोजी कामोठे येथे घेण्यात आली होती. या कुस्ती स्पर्धेत अमेघाने उत्कृष्ट प्रकारची आपली तालीम दखविली आहे. याप्रसंगी तिच्यावर संपूर्ण रायगड मधील कुस्तीपटूंचाच नव्हे तर सामान्य जनतेचा ही शुभेच्छांचा वर्षाव सुरू होत आहे. कारण एक मुलगी असून या कुस्ती क्षेत्रात आपले नावलौकिक केले आहे.उरणची अमेघा हिचे सर्वत्रच कौतुक होत आहे. आजकालच्या जगात मुली कोणत्याच क्षेत्रात मागे नाहीत. मुली फक्त चूल आणि मूल हे करत न बसता प्रत्येक क्षेत्रात दैदिद्यमान यश मिळवत आहेत. त्याचेच एक उत्तम उदाहरण जगासमोर ठेवत उरण तालुक्यातील अमेघा घरतने हा मान मिळविला आहे.अमेघाला लहानपणापासूनच क्रीडा क्षेत्राची आवड होती . तिच्या परिवारानेही तिला तिच्या आवडता क्षेत्र निवडण्यासाठी प्रोत्साहन दिले आणि यातूनच आता अमेघा ही उरणचे नाव लौकिक करत संपूर्ण महाराष्ट्रात नाव गाजवत आहे. अमेघावर सर्वच क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आणि तिच्या भविष्यासाठी पुढील वाटचालीसाठी ही तिच्यावर आशीर्वादांचा वर्षावही होत आहे. या सर्वांमुळे तिच्या आई-वडिलांनाही आपल्या मुलीचे खूप कौतुक वाटत आहे.
कारण आपली मुलगी तिच्या आवडीच्या क्षेत्रात नावलौकिक करताना पाहून त्यांच्याही डोळ्यांचे पारणे फिटत आहे.