pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

शिवभक्त मंगेश चिवटे, बाजीराव चव्हाण,चैतन्य पाटील यांना राज सदर श्री रायगड येथे शिवरत्न पुरस्कार प्रदान.

0 1 7 4 0 8

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.8

वर्ष १ जानेवारी २००० पासून श्री रायगड वारीला सुरुवात झाली आहे.२०११ पासून समाज्यात चांगल्या प्रेरणादाई काम केलेल्या लोकांना “शिवसंत आणि शिवरत्न” या उपाधीने श्री क्षेत्र दुर्गराज किल्ले श्री रायगडावरील पवित्र सदरेवर गौरविले जाते.यावर्षी जानेवारी २०२४ चे गौरवमूर्ती हे शिवभक्त चैतन्य पाटील चिर्ले, तालुका उरण,जिल्हा रायगड यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून निस्वार्थ रुग्ण सेवा केल्या बद्दल तसेच अनेक रुग्णांचे जीव वाचविल्याबद्दल, समाजात विविध ठिकाणी महाआरोग्य शिबीर भरविणे, आरोग्या विषयी जनजागृती करणे आदी कार्याची दखल घेत मंगेश चिवटे, बाजीराव चव्हाण,चैतन्य पाटील यांना महाराजांच्या आज्ञेनुसार पवित्र सदरेवर छत्रपती श्री शिवराय अभियान केखले, पन्हाळा, कोल्हापूर (छत्रपती श्री शिवाजीमहाराजांच्या समाधीचे पूजन करणारी संस्था वर्ष २००० पासून अखंडित सेवा चालू आहे.) आणि राजश्री शिवबा विचार प्रसारक मंडळ ट्रस्ट, नवी मुंबई, (शिवकार्य क्षेत्र जगभरात) या संस्थेच्या वतीने अर्पण करण्यात आला. संस्थेची अशी मान्यता आहे की हा सन्मान दस्तुरखुद्द छत्रपती श्री शिवाजीमहाराज हा सन्मान देतात आपली संस्था फक्त मध्यस्ती आहे याच भावनेने का कार्यक्रम पार पढला जातो. कार्यक्रमाला शिवसंत कृष्णाजी पाटील गुरुजी, छत्रपती श्री शिवाजीमहाराजांच्या समाधीचे पुजारी,राजश्री शिवबा विचार प्रसारक मंडळ ट्रस्टचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवसंत विजयदादा शहाबाई रंगराव खिलारे, संस्थेचे प्रेरणास्थान शिवसंत नुतनआई खिलारे उपस्थित होते. त्यात मुख्यमंत्री सहायत्ता निधीचे प्रमुख मंगेश चिवटे, बाजीराव चव्हाण,प्रवीण पाटील, मराठा मंडळाचे अध्यक्ष, वॉशिंग्टन डिसी, अमेरिका. अ. नगरचे शिवभक्त सुनील क्षीरसागर, सुनील जगदाळे, उप-आयुक्त, वस्तू व सेवा कर विभाग, माझगाव, मुंबई. मूर्तिकार मिलिंद मोरे, माजीवडा, ठाणे, मूर्तिकार नितिन गोरडे, ऐरोली, नवी मुंबई, मूर्तिकार तेजस भोईर अंबरनाथ, ठाणे,शिवसंस्कृती सामाजिक व बहुउदेशी ट्रस्ट, ठाणे, विजय कदम कामोठे नवी मुंबई, सुधीर जगदाळे ठाणे, संतोष साबळे आणि वनिता साबळे यांना त्यांच्या चांगल्या प्रेरणादाई सामाजिक शिवकार्या बद्दल “शिवरत्न” म्हणून पावन सदरेवर सन्मानित केले गेले. नवीन वर्षाची सुरुवात ही श्री रायगडावरील महाराजांच्या समाधीला जलाभिषेक घालून पूजन करून नवीन वर्षाची सुरुवात करून तिथे निमंत्रित केलेल्या मान्यवरांचा सन्मान करून गड दर्शन आणि गडाची स्वछतेने करण्यात आली.आणि कार्यक्रमाची सांगता जिजाऊ आऊसाहेबांच्या समाधीला नतमस्तक होऊन करण्यात आली.मुख्यमंत्री सहायत्ता निधीचे प्रमुख मंगेश चिवटे, बाजीराव चव्हाण,उरण तालुक्यातील चिर्ले येथील सामाजिक कार्यकर्ते चैतन्य पाटील यांना शिवरत्न पुरस्कार मिळाल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे